-
तुळसीच्या बिया वजन नियंत्रित राखण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. त्यात मोठ्या प्रमाणात असणाऱ्या ओमेगा ३ फॅटी अॅसिडमुळे ते सुपरफूड बनते. या बियांचे सेवन केल्याने तुमचे वजन प्रभावीपणे कमी होऊ शकते.
-
उन्हाळयाच्या दिवसात या बिया आपल्या पेयांमध्ये घालून याचे सेवन करणे हा शरीराला थंडठेवण्यासाठीचा उत्तम उपाय आहे.
-
कडक उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी तुळशीच्या बिया उपयुक्त असण्यासोबतच त्यांच्यामुळे विषाणूजन्य, सर्दी आणि तापासारख्या समस्यांपासूनही आराम मिळतो.
-
तुळशीच्या बियांचे सेवन केल्याने पचनाच्या समस्या आणि पोट फुगण्यापासून आराम मिळतो.
-
तुळशीच्या बियांमध्ये अँटिस्पास्मोडिक गुणधर्म असतात जे कोरड्या खोकल्यावर उपचार करण्यास आणि तणावग्रस्त स्नायूंना आराम देण्यास मदत करतात.
-
तुळशीच्या बियांमध्ये असलेले डाएटरी फायबर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
-
तुळशीच्या बिया शरीरासाठी नैसर्गिक डिटॉक्स म्हणून काम करतात आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम देतात.
-
जतुळशीच्या बियांमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि फ्लेव्होनॉइड्स भरपूर असतात जे त्वचेचे आरोग्य सुधारण्यास आणि नवीन पेशींच्या वाढीस प्रोत्साहन देतात.
-
तुळशीच्या बिया नैसर्गिकरित्या शरीराला डिटॉक्स करतात आणि शौचाला मदत करतात.
(फोटो सौजन्य : संग्रहित छायाचित्र)
Photos : उत्तम आरोग्यासाठी तुळशीच्या बिया आहेत कमालीच्या; फायदे ऐकून व्हाल चकित…
आपल्या देशात तुळशीच्या झाडाला धार्मिक आणि आयुर्वेदात फार अधिक महत्व आहे. प्रत्येकाच्या घरात आपल्याला तुळशीचे झाड दिसून येते. तुळशीचा उपयोग आरोग्या संबंधित विविध आजारांपासून बचाव करण्यासाठी केला जाते. तुळशीच्या पानांपेक्षा त्याच्या बियांचा सुद्धा फार मोठा फायदा आपल्या आरोग्याला होतो.
Web Title: Tulsi seeds are great for good health pdb