-
केसांमुळे एखाद्या व्यक्तीचे सौंदर्य अधिक खुलते. आपण आकर्षक दिसाव असं प्रत्येकालाच वाटत असते, त्यामुळे काहीजण केसांची विशेष काळजी घेत असतात. त्यासाठी वेगवेगळे हेअर प्रोडक्ट्स वापरले जातात. वेगवेगळ्या ब्रँडचे शॅम्पू, कंडिशनर यांवर बराच खर्च केला जातो.
-
असे बरेच उपाय करूनही कधीकधी अपेक्षित परिणाम दिसत नाही. कारण केसांना मुळापासून मजबुत करणे गरजेचे असते. काही पदार्थ खाल्ल्याने केस मुळांपासून मजबुत होण्यास मदत मिळते. कोणते आहेत ते पदार्थ जाणून घ्या.
-
एवोकॅडो : एवोकॅडो या फळामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन इ असते. ‘व्हिटॅमिन इ’मुळे केस मजबुत आणि दाट होण्यास मदत मिळते. त्यामुळे केसांच्या वाढीसाठी आहारामध्ये एवोकॅडोचा समावेश करा.
-
गाजर : गाजरामध्ये भरपूर प्रमाणात मिनरल्स आणि अनेक पोषक तत्वे आढळतात. गाजर खाणे डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले असते असे तुम्ही अनेकवेळा ऐकले असेल. पण डोळ्यांसह केसांसाठीही गाजर खाणे फायदेशीर ठरते. गाजरामध्ये असणाऱ्या ‘व्हिटॅमिन ई’मुळे स्कॅल्प आणि सेल्सची वाढ करण्यास मदत करतात, ज्यामुळे केस चमकदार आणि निरोगी बनतात.
-
मासे : मासे खाल्ल्याने केस निरोगी राहतात कारण त्यात, भरपूर प्रमाणात बायोटिन आढळते. तसेच मासे खाल्ल्याने केसगळती कमी होऊ शकते.
-
अंडी : प्रोटीनचा उत्तम स्त्रोत मानली जाणारी अंडी आरोग्यासह केसांसाठीही फायदेशीर ठरतात. आहारामध्ये अंड्यांचा समावेश केल्याने केसांची वाढ होण्यास मदत मिळते.
-
ड्रायफ्रुट्स : बदाम, अक्रोड यांसारखे ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने केस दाट आणि मजबुत होतात.
-
(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)
-
(फोटो सौजन्य : Freepik)
Foods For Hair Growth : केसांच्या वाढीसाठी मदत करतात ‘हे’ पदार्थ; पाहा यादी
Web Title: Include these food items in diet for hair growth pns