-
कार्यालयामध्ये विविध स्वभावाचे सहकारी तुम्हाला आढळून येतील. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. कधी कधी स्वभाव पटत नसल्याने त्यांच्याशी जुळवून घेणे कठीण जाते. (source – pexels)
-
अशा सहकाऱ्यांशी जुळवून घेण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही टीप्स देत आहोत. (source – pexels)
-
आपले मत अनेकवेळा व्यक्त करा – तुमच्या सहकाऱ्याने तुम्ही बोललेले ऐकले नाही तर आपले मत त्याला ठासून सांगा, जेणेकरून तो तुमचे काम गांभीर्याने घेईल. (source – pixabay)
-
जो पर्यंत तुम्ही तुमच्या सहकाऱ्याला स्पष्ट शब्दांत आणि काटेकोरपणे आपले मत सांगणार नाही, तोपर्यंत तुम्हाला त्रास होईल असाच तो वागेल. (source – pixabay)
-
सहकाऱ्याचे व्यक्तिमत्व स्विकारा – आपल्या सहकाऱ्याचे व्यक्तीमत्व स्विकारा. त्याला त्याच्या पद्धतीने काम करू द्या. (source – pixabay)
-
जेव्हा व्यक्तीला त्याच्या आवडीचे काम दिले जाते तेव्हा तो ते उत्कृष्टपणे करण्याची शक्यता अधिक असते (source – pixabay)
-
गप्पागोष्टींपासून दूर राहा – काम व्यवस्थित न करणाऱ्या कर्मचाऱ्याविषयी गप्पा सुरू असल्यास त्यात पडू नका. अशा गप्पागोष्टींपासून दूर राहा. (source – pixabay)
-
दुसऱ्या व्यक्तीविषयी होत असलेल्या नकारात्मक चर्चांपासून स्वत:ला दूर ठेवल्यास कार्यस्थळामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होईल. (source – pixabay)
-
वरिष्ठांशी बोला – एखादा सहकारी तुमच्या कामामध्ये अडथळा निर्माण करत असेल तर त्याबाबत तुमच्या वरिष्ठांचा सल्ला घ्या. (source – pixabay)
-
वरिष्ठ तुम्हाला या समस्येतून बाहेर निघण्याचा मार्ग सांगू शकतील. (source – pexels)
-
तुम्हाला कोणत्या परिस्थितीमध्ये राग येतो आणि कोणत्या कारणांमुळे राग येतो, याबाबत माहिती घ्या. तुम्हाला राग येईल अशी स्थिती तुमचा सहकारी निर्माण करत असेल तर तशी स्थिती टाळा. (source – pexels)
-
सहकाऱ्याच्या सकारात्मक वैशिष्ट्यांवर लक्ष द्या, त्याने चांगले काम केले असेल तर त्याचे कौतुक करा. (source – pexels)
डोक्याला ताप वाटणाऱ्या सहकाऱ्यांसोबत ऑफिसात कसं वागावं? जाणून घ्या खास टिप्स
कार्यालयामध्ये विविध स्वभावाचे सहकारी तुम्हाला आढळून येतील. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. अशा सहकाऱ्यांशी जुळवून घेण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही टीप्स देत आहोत.
Web Title: Tips to work with difficult coworkers in office ssb