-
घराघरांत दिवाळीची साफसफाई सुरू झाली आहे. प्रत्येकजण या काळात अस्वच्छ झालेल्या वस्तू स्वच्छ करतो.
-
दिवाळीची साफसफाईमध्ये स्वयंपाकघर स्वच्छ करणं हे मोठं आव्हानच असतं.
-
स्वयंपाकघर स्वच्छ करण्यासाठी नेहमी स्वच्छ कापड वापरा.
-
जर तुम्ही स्वयंपाकघर आधीच घाणेरडे किंवा धुळीने माखलेल्या कपड्याने स्वच्छ केले तर स्वयंपाकघर खूप अस्वच्छ होईल.
-
जर तुम्हाला तुमचा जेवण, पदार्थ हेल्दी हवे असेल तर काही काळ ते अन्न दुसऱ्या खोलीत ठेवा.
-
तुमच्या स्वयंपाकघरात एअर टाइट कंटेनर असणे खूप महत्वाचे आहे. -
स्नॅक्स, कडधान्ये, ड्राय फ्रूट्स, बिस्किटे यासाठी एअर टाइट डब्यांचा वापर करा.
-
स्वयंपाकघर स्वच्छ करताना काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात कारण घरातील बहुतेक खाद्यपदार्थ स्वयंपाकघरातच ठेवलेले असतात.
-
स्वयंपाकघरातील वस्तू स्वच्छ करुनच वापरा.
-
साफसफाई करताना भांडी प्लास्टिकच्या पॉलिथिनमध्ये पॅक करून दुसऱ्या खोलीत ठेवा.
-
तुम्ही फ्लोअरसाठी केमिकल असलेले क्लीनिंग लिक्विड किंवा फिनाईल वापरू शकता.
-
स्वयंपाकघर स्लॅब, टाइलवर कधीही जास्त केमिकल लिक्विड वापरू नका. (फोटो सौजन्य : pixabay)
Photos : दिवाळीत स्वयंपाकघर स्वच्छ करताना ‘या’ चुका टाळा!
दिवाळी आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे प्रत्येकजणांच्या घरात साफ सफाईची मोहिम सुरू झाली आहे. या काळात प्रत्येक गृहिणी आपले स्वयंपाकघर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करत असते. पण स्वयंपाकघराची साफसफाई करताना कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत हे आज आपण आज जाणून घेऊया..
Web Title: Avoid these mistakes while cleaning the kitchen this diwali pdb