-
दिवाळीची लगबग सर्वत्र सुरू आहे. दिवाळीला आपल्याकडे अनेक वस्तूंची खरेदी केली जाते.
-
दिवाळीच्या काळात आणि खासकरून धनत्रयोदशीला सोन्या-चांदीची खरेदी केली जाते. सोन्याची नाणी विकत घेतली जातात.
-
या दिवसांमध्ये सोने खरेदी करणे शुभ मानले जाते.
-
तुम्ही जेव्हा सोने खरेदी करण्यासाठी बाहेर जाताय त्यापूर्वी तुम्ही नेहमी सोन्याच्या किमती जाणून घ्या कारण ते वेळोवेळी बदलत असतात.
-
दिवाळी किंवा धनत्रयोदशी सोने खरेदी करताना विश्वासार्ह ठिकाणाहूनच सोने खरेदी करा.
-
तुम्ही सोने खरेदी करत असाल, तर खरे आणि खोटे सोने यात फरक करा.
-
सोने खरेदी करताना नेहमी हॉलमार्क चिन्ह तपासा. खऱ्या-खोट्या सोन्याबरोबरच त्याची शुद्धताही ओळखते.
-
तुम्ही हिऱ्याचे दागिने हे कुठल्याही मोठ्या दुकानातून घेण्याएवजी एखाद्या छोट्या दुकानातून खरेदी करा आणि IGI सर्टिफिकेट देखील नक्की घ्या.
-
या धनत्रयोदशी किंवा दिवाळीच्या मुहूर्तावर तुम्ही सोने खरेदी करत असाल तर पक्के बिल घ्या.
-
जर तुम्ही कुठले महाग रत्न खरेदी करत आहात तर त्याच्या कॉलीटीचे सर्टिफिकेट देखील घ्या. त्यासोबतच त्या रत्नाची रिसेल किंवा बायबॅक वॅल्ह्यू देखील माहित करून घ्या.
-
सोने खरेदी करताना, तुमच्या सोन्यात किती सोल्डर आहे हे जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे.
-
खरेदी करताना थोडं सावध होऊन त्यांच्या शुद्धतेची तपसणी करूनच खरेदी करा. (फोटो सौजन्य : Freeimages)
Photos : धनत्रयोदशीला सोने खरेदी करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर होणार फसवणूक
सोने खरेदी करणे हा आपल्याकडे बहुतेकांच्या आवडीचा विषय असतो. स्त्रियांच्या तर हा विशेष जिव्हाळ्याचा विषय. त्यातच आता धनत्रयोदशी आणि दिवाळी जसजशी जवळ येत आहे तसतसे सोने खरेदी करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. मात्र, सणांच्या गर्दीत अनेकवेळा फसवणूक होण्याची भीती असते. ग्राहकांची होणारी फसवणूक आणि आर्थिक नुकसान थांबवण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. जेणेकरून तुमचे…
Web Title: Things to keep in mind before buying gold on dhanteras pdb