-
निरोगी आणि तंदुरुस्त शरीरासाठी आवश्यक पोषक तत्वांचे सेवन करणे खूप महत्वाचे असते. बदामामध्ये व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. बदाम खाऊन तसेच त्वचेवर लावल्याने चमक येते.
-
ड्रायफ्रुट्स सगळ्यांनाच आवडतात, त्यातही सर्वात जास्त आवडणारा ड्राय फ्रूट म्हणजे काजू. काजूमध्ये भरपूर पोषक असतात. हिवाळ्यात काजू खाल्ल्याने त्वचा चमकदार होते आणि शरीर उबदार राहते.
-
अक्रोडमध्येही मोठ्या प्रमाणात पोषक घटकांचा साठा आहे. अक्रोड खाल्ल्याने आपल्याला आरोग्यवर्धक तसंच सौंदर्यवर्धक लाभही मिळतात. अक्रोडचे सेवन करणं आपल्या त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर असते.
-
अंजीर हे फळ बहुगुणी आहे. हिवाळ्यात रात्री झोपण्यापूर्वी दूध आणि अंजीराचं सेवन केल्यास याचे अनेक फायदे आहेत.यामुळे शरीर उबदार राहते आणि त्वचा निरोगी होते.
-
पिस्त्यामध्ये अनेक अँटिऑक्सिडंट्स असतात. शिवाय, त्यात व्हिटॅमिन बी ६, प्रथिने, कॉपर आणि फॉस्फरस इत्यादी खनिजांचे प्रमाण भरपूर असते. पिस्ता त्वचेचे अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून संरक्षण करते आणि वृद्धत्वापासून बचाव करते.
-
तुम्ही तुमच्या घटत्या वजनामुळे त्रस्त असाल आणि चांगल्या आरोग्यासाठी वजन वाढवायचे असेल तर मनुका हे एक उत्तम अन्न पूरक आहे. यामध्ये नैसर्गिक साखर भरपूर असते ज्यामुळे वजन वाढण्यास मदत होते.
-
मखाना हे एक पौष्टिक आणि अनेक प्राक्रुतिक व औषधी गुणधर्माने युक्त असे कमळाचे बीज आहे. भरपूर प्रोटिन, कार्बोहायड्रेट, मँग्नेशिअम, फॉस्फरस, व पोटॅशिअमने युक्त असे मखाना आहे. मखाना हे हृदय व किडनिला हेल्दी ठेवतात.
-
खजूर हे अत्यंत पौष्टिक असून सुदृढ शरीरासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. खजूर खाण्यामुळे शारीरिक दुर्बलता, अशक्तपणा, ऍनिमिया दूर होतो. तसेच यात असणाऱ्या पोटॅशियम घटकांमुळे मांसपेशी वाढण्यास मदत होऊन हेल्दी वजन वाढते.
-
शेंगदाण्यात प्रोटीन, फायबर, खनिजे, व्हिटामिन आणि अँटीऑक्सिंडट्स मोठ्या प्रमाणात असतात. शेंगदाण्यात कॅल्शियम आणि व्हिटामिन डीची मात्रा अधिक असते. त्यामुळे हाडेही मजबूत होतात. (फोटो साैजन्य-pixabay)
Photos : हिवाळ्यात करा ‘या’ ड्रायफ्रुट्सचे सेवन; त्वचा होईल अधिक तजेलदार आणि सुंदर
हिवाळ्यामध्ये आरोग्याच्या छोट्या-मोठ्या तक्रारी उद्भवतात. तापमानात घट झाल्यानं सर्दी-खोकला, ताप, त्वचेशी संबंधित विकार इत्यादी त्रास निर्माण होतात. या समस्या टाळण्यासाठी शरीराचे तापमान संतुलित ठेवणे आवश्यक आहे. हिवाळ्यात आरोग्य निरोगी राहण्यासाठी तसेच त्वचेला अधिक तजेलदार आणि सुंदर बनविण्यासाठी रोज ड्रायफ्रूट्सचे सेवन करा. जाणून घेऊया या ड्रायफ्रूट्स यादी…
Web Title: Winter dry fruits skin radiant dates and nuts figs dates almonds cashew pistachios