-
शरिराची नियमित अंतर्गत स्वच्छता करणे आवश्यक आहे. (source – freepik)
-
अपौष्टिक आहाराचे सेवन केल्याने शरिरामध्ये विषारी पदार्थ जमा होऊ लागतात. हे पदार्थ लग्वीद्वारे बाहेर पडतात. तरी देखील काही प्रमाणात हे शरिरातच राहतात. (source – )
-
बॉडी डिटॉक्सच्या माध्यमातून या विषारी पदार्थांना शरिराच्या बाहेर काढून यकृत आणि मुत्रपिंडाला स्वच्छ करता येते. (source – pixabay)
-
घरगुती उपयांनी तुम्ही शरिरातील विषारी पदार्थ बाहेर काढू शकता.
-
भरपूर पाणी प्या. पाणी शरिराचे तापमान नियंत्रणात ठेवण्यासह पाचन क्रिया वेगवान करते आणि अन्न पदार्थांमधील पोषक तत्वे शोषण्याचे कार्य वाढवते. (source – pexels)
-
दिवसातून ३ ते ४ लिटर पाणी प्यायले पाहिजे असा सल्ला तज्ज्ञ देतात. (source – pexels)
-
प्रोबायोटिक्सचे सेवन करा. प्रोबायोटिक्स एक प्रकारचे फायबर आहे जे तुमच्या आतड्यांमधील चांगले बॅक्टरिया निरोगी ठेवण्यात मदत करतात आणि पचनक्रियेचा वेग वाढवतात. (source – pexels)
-
दही, ताक आदीचे सेवन केल्याने तुम्हाला अनेक शारीरिक फायदे मिळू शकतात. आहारात फायबर असलेल्या पदार्थांचे सेवन करून तुम्ही शरीर डिटॉक्स करू शकता. (source – pexels)
-
शरिरातील विषारी पदार्थ काढण्यासाठी तुम्ही भाज्यांचे ज्यूस प्यायला हवे. पालक, लिंबू, काकडी, आले, बीट, गाजर इत्यादींचे ज्युस शरिराला डिटॉक्स करण्यात मदत करते. (source – pexels)
शरिरातून विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी ‘या’ पेयांचे करा सेवन
शरिराची नियमित अंतर्गत स्वच्छता करणे आवश्यक आहे. अपौष्टिक आहाराचे सेवन केल्याने शरिरामध्ये विषारी पदार्थ जमा होऊ लागतात. बॉडी डिटॉक्सच्या माध्यमातून या विषारी पदार्थांना शरिराच्या बाहेर काढता येऊ शकते.
Web Title: Home remedies to detox your body ssb