-
हिवाळ्यात त्वचेचा मुलायमपणा कमी होऊन रुक्ष होते. थंडीत पाण्यात खूपवेळ राहितल्यानं किंवा मातीमुळे पायांच्या टाचांना भेगा पडतात.
-
स्वच्छ व सुंदर पाय हे सौंदर्याचं एक लक्षण आहे. परंतु, पायांना भेगा हे बऱ्याच बायकांना होणारी समस्या आहे.
-
भेगा पडलेल्या टाचांचा त्रास होत असेल तर रात्री झोपण्यापूर्वी कडुलिंबाच्या तेलात हिंग मिसळून टाचांवर लावा. नंतर त्यावर पॉलिथिन बांधा. जेणेकरून पायाचा ओलावा टिकून राहून तेल निघत नाही. सकाळी तुम्हाला भेगा पडलेल्या घोट्यांमध्ये आराम वाटेल.
-
व्हॅसलिनमध्ये त्वचा मुलायम करणारे सर्व ते गुणधर्म असतात. त्यामुळेच थंडीच्या दिवसात व्हॅसलिन जास्त प्रमाणात वापरले जाते. जर पायांच्या भेगा दूर करायच्या असतील तर पाय स्वच्छ धुवून घ्यावेत. पाय कोरडे करावेत व त्यावर मग व्हॅसलिन लावून पायांना मोजे घालावेत.
-
बादलीत गरम पाणी घ्या. नंतर या पाण्यात मध टाका आणि सुमारे वीस ते पंचवीस मिनिटे पाय भिजत ठेवा. ठरलेल्या वेळेनंतर पाय बाहेर काढून पुसून टाका आणि फुट क्रीमने मसाज करा. भेगा पडलेल्या टाचांवरही मधाच्या मदतीने आराम मिळतो.
-
पिकलेल्या केळ्याचा लगदा घ्या आणि भेगा पडलेल्या टाचांवर लावा. नंतर हलके मसाज करताना अर्धा तास राहू द्या. पाय धुण्यासाठी साबण न वापरण्याची काळजी घ्या. त्यामुळे भेगा पडलेल्या टाचांमध्येही आराम मिळतो.
-
भेगा पडलेल्या टाचांचा त्रास होत असेल तर खोबरेल तेल गरम करून त्यात मेण मिसळा. नंतर घोट्यांवर सोडा. सकाळी पाय धुवा. मेण आणि खोबरेल तेल देखील भेगा पडलेल्या टाचांवर आराम देतात.
-
रोज बादलीभर कोमट पाण्यात मूठभर मीठ टाकून १५-२० मिनिटे त्यात पाय ठेवून बसावे. नंतर तेल लावून मसाज करावे. यामुळे पायावरची मृत त्वचा निघून जाण्यास मदत होते. पाय मऊ होतात.
-
कडूलिंबाच्या पानांचा उपयोग पायाच्या भेगा दूर करण्यासाठी होतो. कडूलिंबामध्ये असणाऱ्या अँटी ऑक्सिडंट्स गुणधर्मामुळे पायांवरील भेगा लगेच भरण्यास मदत होते. त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये जर पायाला भेगा पडल्या असतील तर नक्की कडूलिंब याचा उपयोग करावा.
-
टाचांना तडे जाण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे तेथे पाणी न पोहोचणे, त्यामुळे टाचांपर्यंत ओलावा टिकून राहत नाही. सामान्यतः लोकांना हे माहित नसते की टाचांना भेगा पडण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे पाण्याची कमतरता, म्हणून पुरेसे पाणी प्या.
-
रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात थोडासा लिंबाचा रस मिसळून त्यात १०-१५ मिनिटे पाय सोडून बसावे. त्यानंतर पायांना स्क्रब करून पाय धुवावेत. लिंबाच्या रसामुळे त्वचा मऊ आणि मुलायम बनते. तसेच मृत झालेली त्वचा निघून जाते.
-
कोरफड ही सुद्धा अत्यंत गुणकारी असते. कोरफडीचा गर जर पायांना लावला तर पायांना थंडावा मिळतो व पायाच्या त्वचेतील रुक्षपणा, खरखरीतपणा कमी होतो. (फोटो सौजन्य : pixabay)
Photos : हिवाळ्यात टाचांना भेगा पडल्यात? जाणून घ्या ‘हे’ सोपे घरगुती उपाय!
हिवाळ्यामध्ये आपण आपल्या त्वचेची खूप काळजी घेतो. हिवाळ्यात जर आपली त्वचा कोरडी पडली तर अनेक त्रास होतात. त्वचेवर रॅश येणे, अंगाला खाज सुटणे, त्वचा पांढरी पडणे यांसारखे अनुभव येऊ शकतात. यामध्ये पायाच्या टाचांना भेगा पडणे हा अगदी सगळ्यांनाच होणारा त्रास आहे. हिवाळ्यामध्ये वातावरणामध्ये ओलावा कमी असल्यामुळे हा त्रास वाढू लागतो. यंदाच्या हिवाळ्यात हा त्रास तुम्हाला…
Web Title: Cracked heels in winter know these easy home remedies pdb