-
आपल्या खाद्य संस्कृतीमधील अनेक पदार्थांमध्ये मनुक्यांचा वापर केला जातो. गोड पदार्थांमध्ये तर ते आवर्जून वापरले जातात. मात्र चवीसाठीच नाही तर अनेक आरोग्यदायी फायद्यांसाठीही मनुक्यांचे सेवन केले जाते. मनुकेच नाहीत तर मनुक्यांचे पाणीही आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.
-
मनुक्यांचे पाणी आपल्या शरीराला ऊर्जा देण्याचे एक उत्तम स्रोत मानले जाते. हृदयाचे आरोग्य सुधारण्यापासून ते आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही मनुक्यांचे पाणी फायदेशीर आहे. मनुक्यांच्या पाण्याचे इतर फायदे आणि हे पाणी बनवण्याची पद्धत जाणून घेऊया.
-
मनुक्यांचे पाणी प्यायल्याने आपल्या शरीरातील सर्व हानिकारक विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होऊ शकते. हे पेय यकृताची जैवरासायनिक प्रक्रिया सुधारते आणि आपले रक्त शुद्ध करण्यास मदत करते. हे पाणी आपले यकृत सहजपणे डिटॉक्स करते.
-
जर तुम्हाला अॅसिडिटीची समस्या भेडसावत असेल तर मनुक्याचे पाणी पिणे एक उत्तम उपाय आहे. हे पाणी तुमच्या पोटातील अॅसिड नियंत्रित करते.
-
मनुक्यांच्या पाण्यात अँटिऑक्सिडंट असतात जे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी या पाण्याचा दैनंदिन आहारात समावेश करणे फायदेशीर ठरू शकते.
-
सकाळी मनुक्यांचे पाणी प्यायल्याने वजनही कमी होण्यास मदत होते. मनुका फ्रुक्टोज आणि ग्लुकोजने समृद्ध असतात जे आपल्याला उर्जा देते. त्यामध्ये फायबरदेखील असते ज्यामुळे आपल्याला जास्त काळ पोट भरल्यासारखे वाटते.
-
मनुक्यांचे पाणी आपले रक्त स्वच्छ करण्याचे काम करते आणि आपले हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते. हे आपल्या शरीरातील खराब कोलेस्टेरॉल काढून टाकते आणि आपल्या हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करते.
-
मनुकामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आपल्या शरीराचे कर्करोगास कारणीभूत ठरणाऱ्या मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करण्यास मदत करतात.
-
मनुक्यांचे पाणी कसे तयार करावे?
-
मनुक्यांचे पाणी तयार करण्यासाठी आपल्याला पाणी, मनुका आणि लिंबू लागेल. दोन कप पाणी आणि १५० ग्रॅम मनुका घ्यावेत. एका पातेल्यात पाणी उकळावे. त्यात मनुके घालून रात्रभर भिजत ठेवा.
-
हे पाणी सकाळी गाळून मंद आचेवर गरम करा आणि रिकाम्या पोटी प्या. जर तुम्हाला या पाण्याची चव वाढवायची असेल तर तुम्ही पाण्यात लिंबू घालू शकता.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. (सर्व फोटो : Freepik)
Photos : अॅसिडिटी ते कॅन्सर; अनेक आजारांवर प्रभावी ठरेल ‘मनुक्यांचे पाणी’; जाणून घ्या बनवण्याची योग्य पद्धत
मनुकेच नाहीत तर मनुक्यांचे पाणीही आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.
Web Title: Acidity to cancer raisin water will be effective against many diseases learn the proper way to make recipe pvp