• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. to get rid of the bad smell of underarms this special home remedy is very beneficial pdb

Underarm Smell: अंडरआर्म्सच्या दुर्गंधीपासून सुटका पाहिजेय, ‘हे’ खास घरगुती उपाय ठरतील फायदेशीर!

Underarms: अंडरआर्म्समधून येणारा घामाचा वास ही एक सर्वात मोठी समस्या आहे. अनेकांच्या शरीराला इतकी दुर्गंधी येते की त्यांच्या जवळ बसणे कठीण होते. अनेकांना ही समस्या भेडसावत असते. अंडरआर्म्सचा वास दूर करण्यासाठी कोणते घरगुती उपाय केले पाहिजेत, हे जाणून घेऊयात.

November 27, 2022 14:19 IST
Follow Us
  • अनेकदा अंडरआर्म्समधून (Underarms) दुर्गंधी येऊ लागते. त्यामुळे त्या व्यक्तीचा आत्मविश्वास तर कमी होतोच पण मित्रांमध्‍येही लाजिरवाणेपणाचा सामना करावा लागतो. अंडरआर्म्समधून घामाचा वास येणं हे नक्कीचं चांगलं नाही. पण काही बदल करून तुम्ही या समस्येपासून सुटका मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊया या दुर्गंधीपासून सुटका कशी मिळवायची. (Photo-Indian express)
    1/12

    अनेकदा अंडरआर्म्समधून (Underarms) दुर्गंधी येऊ लागते. त्यामुळे त्या व्यक्तीचा आत्मविश्वास तर कमी होतोच पण मित्रांमध्‍येही लाजिरवाणेपणाचा सामना करावा लागतो. अंडरआर्म्समधून घामाचा वास येणं हे नक्कीचं चांगलं नाही. पण काही बदल करून तुम्ही या समस्येपासून सुटका मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊया या दुर्गंधीपासून सुटका कशी मिळवायची. (Photo-Indian express)

  • 2/12

    ज्या व्यक्ती रोज आंघोळ करत नाहीत त्यांच्या शरीरातून अनेकदा दुर्गंधी जास्त येते. त्यामुळे रोज आंघोळ नक्की करा. हे तुमच्या अंडरआर्म्समध्ये बॅक्टेरिया वाढण्यास प्रतिबंध करेल, ज्यामुळे तुमच्या शरीराची दुर्गंधी कमी होईल. (Photo-Jansatta)

  • 3/12

    अंडरआर्म्समधून दुर्गंधी येण्याचे एक कारण म्हणजे चुकीचा आहार. जे लोक जेवणात सल्फरचे प्रमाण जास्त घेतात, त्यांना शरिराच्या दुर्गंधीच्या समस्येने त्रास होऊ शकतो. त्यामुळे ज्या पदार्थांमध्ये सल्फरचे प्रमाण कमी असते अशाच गोष्टी खाव्यात.

  • 4/12

    कोरफड जेल तुमच्या अंडरआर्मची त्वचा मऊ आणि हायड्रेट ठेवण्याचे कार्य करते. अंडरआर्म्समधून दुर्गंधी दूर करण्यासाठी, काखेवर कोरफड जेल चोळा आणि सुमारे ३० मिनिटांनी भरपूर पाण्याने धुवा.

  • 5/12

    टी ट्री ऑइलमध्ये असलेले घटक बॅक्टेरिया नष्ट करण्यास मदत करतात. तुम्ही दोन थेंब पाण्यात मिसळून ते कापसाच्या साहाय्याने हाताखाली लावू शकता.

  • 6/12

    त्वचेचा रंग उजळण्यासाठी बटाट्यातील घटक पोषक असल्याचे म्हटलं जातं. बटाट्याचे काप तुम्ही थेट अंडरआर्म्सवर रगडू शकता किंवा बटाट्याचा रसही वापरू शकता. बटाटा सोलल्यानंतर तो तुमच्या अंडरआर्ममध्ये घासून घ्या आणि काही वेळाने तो चांगला धुवा, त्यामुळे वास निघून जाईल.

  • 7/12

    सफरचंद सायडर व्हिनेगर हा घामाच्या वासापासून मुक्त होण्याचा एक अतिशय प्रभावी उपाय मानला जातो. मिश्रण तयार करण्यासाठी सफरचंद व्हिनेगर आणि कापूस आवश्यक आहे. सफरचंद सायडर व्हिनेगरच्या भांड्यात कापसाचा गोळा बुडवा आणि काखेत लावा.

  • 8/12

    खोबरेल तेलात व्हिटॅमिन ई असते. अंडरआर्मला १५ मिनिटे खोबरेल तेलाने मसाज करा आणि अर्ध्या तासानंतर साबण आणि पाण्याने धुवा.

  • 9/12

    बेकिंग सोडा अंडरआर्म्सची दुर्गंधी दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. त्यात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म आहे. ते वापरण्यासाठी, प्रथम बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस समान प्रमाणात मिसळा आणि नंतर आंघोळ करण्यापूर्वी हे मिश्रण काखेत लावा आणि दोन ते तीन मिनिटे राहू द्या. यानंतर तुम्ही आंघोळ करू शकता.

  • 10/12

    लिंबू हे नैसर्गिक ब्लीचिंग एजंट मानले जाते. अंघोळीपूर्वी अर्धे लिंबू रोज अंडरआर्म्सवर लावा. दोन-तीन मिनिटे चोळा म्हणजे दुर्गंधीपणा दूर होण्यास मदत होईल.

  • 11/12

    अंडरआर्म्सच्या दुर्गंधीपासून सुटका मिळवण्यासाठी टोमॅटोचा रस वापरता येऊ शकतो. यासाठी टोमॅटो मिक्सरमध्ये वाटून त्याचा रस काढा आणि त्यात लिंबाचा रस घाला. अंडरआर्म्सवर मसाज करा आणि काही वेळाने धुवा. टोमॅटोचा रस अंडरआर्म्सचा वास कमी करण्यासाठी प्रभावी आहे.

  • 12/12

    हळद बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. यामुळे अंडरआर्म्सचा वासही दूर होईल आणि रंगही स्पष्ट होईल.हळद पावडरमध्ये पाणी मिसळून पेस्ट बनवा आणि अंडरआर्म्सवर लावल्यानंतर १० मिनिटांनी धुवा.
    (फोटो सौजन्य-freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleहेल्थ टिप्सHealth Tips

Web Title: To get rid of the bad smell of underarms this special home remedy is very beneficial pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.