-
Shani Transit In Kumbh: २०२३ च्या जानेवारी मध्ये शनिग्रह गोचर करून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. शनि हा कर्मदाता म्हणून ओळखला जातो. शनीच्या गोचरसह काही राशींच्या कुंडलीत साडे सातीचे योग सुरु होतात तर काहींसाठी ही अच्छे दिन घेऊन येणारी संधी ठरू शकते.
-
येत्या काळात १७ जानेवारी रोजी शनिचे संक्रमण होणार आहे, यामुळेच खूप वर्षांनंतर शश महापुरुष राजयोग सुद्धा तयात झाला आहे.
-
ज्योतिषीय तज्ज्ञांच्या माहितीनुसार शश महापुरुष राजयोगामुळे ३ राशींच्या नशिबाचे दार उघडण्याची संधी आहे. या राशींना पुढील तीन महिन्यात व्यापार वृद्धीची व धनलाभाची संधी आहे
-
वृषभ: शश महापुरुष राजयोग हा वृषभ राशीसाठी प्रगतीची सुवर्णसंधी घेऊन येत आहे, शनिदेव आपल्या राशीत दहाव्या स्थानी गोचर करून स्थिर होत आहेत हे व्यापार व नोकरीशी संबंधित स्थान मानले जाते.
-
पुढील तीन महिन्यात तुमच्या नोकरीत बदलाचे संकेत आहेत. सुदैवाने हे बदल आपल्यासाठी नवनवीन आर्थिक फायदे घेऊन येणारे ठरू शकतात. आपली प्रलंबित कामे मार्गी लागतील.
-
मिथुन: शश महापुरुष राजयोग मिथुन राशीसाठी शुभ काळ घेऊन येत आहे, शनिदेव आपल्या राशीत गोचर करून नवव्या स्थानी स्थिर होणार आहेत. हे स्थान भाग्य व प्रवासाशी संबंधित मानले जाते.
-
पुढील तीन महिन्यात कामाच्या किंवा सहलीच्या निमित्ताने तुम्हाला प्रवासाचे योग आहेत. आपण जर जमीन खरेदी करू इच्छित असाल तर पुढील काही महिने हे आपल्यासाठी शुभ ठरू शकतील. तुम्हाला स्पर्धा परीक्षांच्या बाबत यशप्राप्तीची संधी आहे.
-
शश महापुरुष राजयोग कन्या राशीच्या मंडळींसाठी सोन्याहून पिवळा आसा सुखाचा काळ घेऊन येत आहे. शनिदेव आपल्या राशीत गिचार करून पाचव्या स्थानी स्थिर होत आहेत हे स्थान संतती व प्रेम प्राप्तीशी संबंधित आहे.
-
शनिच्या आशीर्वादाने आपल्या भाग्यात प्रेमयोग तयार होऊ शकतात. आपल्याला हवा तसा जोडीदार लाभण्यासाठी हा अगदी उचित काळ ठरू शकतो. तसेच या काळात आपल्याला यशवृद्धीचे संकेत आहेत यामुळेच भौतिक सुखही आपल्याला लाभू शकते
३० वर्षांनी शनिने साकारला ‘शश राजयोग’; जानेवारीत ‘या’ ३ राशी अचानक धनलाभाने होऊ शकतात श्रीमंत
Shani Transit In Kumbh: 2023 जानेवारीत शनीच्या गोचरसह काही राशींच्या कुंडलीत साडे सातीचे योग सुरु होतात तर काहींसाठी ही अच्छे दिन घेऊन येणारी संधी ठरू शकते.
Web Title: Shani transit 2023 shani dev will make shash mahapurush rajyog after 30 years these zodiac sign could be lucky svs