-
प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात गर्भधारणेचा काळ खूप महत्त्वाचा असतो. या काळात महिलांनी स्वतःची आणि त्यांच्या पोटात वाढणाऱ्या बाळाची विशेष काळजी घेतली पाहिजे.
-
गर्भवती महिलेने तिच्या आहाराकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. या दिवसांमध्ये कोणतेही दुष्परिणाम नसलेले पदार्थ खाणे उत्तम. मात्र, गरोदरपणात कोणत्या भाज्या खाव्यात आणि कोणत्या खाऊ नयेत याबाबत नेहमीची संभ्रम असतो.
-
गरोदर महिला मशरूम खाऊ शकते का? अशा काही प्रश्नांमुळे गरोदर महिला कधीकधी गोंधळून जातात. आज आपण गर्भवती महिलांनी मशरूमचे सेवन करावे की करू नये याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया.
-
मशरूम हे कमी उष्मांक असलेले अन्न आहे. यामध्ये अनेक प्रकारची जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. मशरूम हे आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते. मात्र, गर्भवती महिलांसाठी ते सुरक्षित आहे की नाही याबद्दल शंका आहे.
-
मशरूममध्ये व्हिटॅमिन डी देखील असते जे गर्भधारणेदरम्यान शरीरासाठी खूप महत्वाचे असते. यामुळे महिलांची हाडे मजबूत होतात.
-
मशरूममुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. हे गर्भधारणेदरम्यान स्त्रीला पुन्हा पुन्हा आजारी पडण्यापासून प्रतिबंधित करते. तसेच, मशरूममध्ये असलेले लोह हिमोग्लोबिन तयार करण्यास मदत करते.
-
गरोदरपणात महिलांना अतिरिक्त हिमोग्लोबिनची गरज असते. मशरूममध्ये असलेले झिंक, पोटॅशियम आणि सेलेनियम बाळाच्या विकासात मदत करतात.
-
गर्भधारणेदरम्यान महिला कोणत्याही चिंतेशिवाय मशरूमचे सेवन करू शकतात. परंतु मशरूम खाताना काळजी घेणे आवश्यक आहे.
-
उदाहरणार्थ, बाजारात अनेक प्रकारचे मशरूम उपलब्ध आहेत. गर्भधारणेदरम्यान पॅरासोल मशरूम आणि खोट्या मोरेल्स मशरूमचे सेवन करू नये.
-
गरोदरपणात मशरूमचे सेवन करायला हरकत नाही. पण त्यांचे सुरक्षित पद्धतीने सेवन केले पाहिजे. गर्भवती महिलेने मशरूमचे सेवन करावे, मात्र त्याचे प्रमाण कमी असावे.
-
मशरूम कधीही कच्चे खाऊ नयेत. नीट धुऊन शिजवून खावेत.
-
नेहमी ताजे मशरूम खरेदी करावेत आणि शिजवावेत. स्वयंपाक करण्यापूर्वी हे मशरूम कुजलेले नाही आणि कीटकांपासून मुक्त असल्याची खात्री करावी.
-
काही महिलांना मशरूम खाल्ल्यानंतर अस्वस्थ वाटते. तुम्हालाही मश्रुम खाल्यानंतर अस्वस्थ वाटत असल्यास, पोटदुखी, किंवा उलट्या यासारख्या कोणत्याही समस्यांना जाणवत असल्यास मशरूम खाऊ नका.
-
मशरूम खाण्यापूर्वी, एकदा आपल्या स्त्रीरोगतज्ज्ञाचा सल्ला घेणे चांगले. कारण प्रत्येक स्त्रीची गर्भधारणा वेगळी असते.
-
हेही पाहा: हिवाळ्यात कारले खाण्याचे आश्चर्यकारक फायदे! पोट ते त्वचेच्या अनेक समस्यांवर ठरेल रामबाण उपाय
Photos: गर्भवती महिलांनी मशरूम खावे की नाही? जाणून घ्या याचा गर्भधारणेवर होणार परिणाम
मशरूम हे आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते. मात्र, गर्भवती महिलांसाठी ते सुरक्षित आहे की नाही याबद्दल शंका आहे.
Web Title: Health tips healthy food health care pregnant women should eat mushrooms or not know its effects on pregnancy pvp