-
ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला न्यायाची देवता मानले जाते. शनिदेव मकर राशी सोडून १७ जानेवारी २०२३ला कुंभ राशीत प्रवेश करतील. कुंभ राशीत शनिच्या आगमनामुळे काही राशींसाठी ‘विपरीत राजयोग’ तयार होणार आहे. या राशींच्या लोकांना विपरीत राजयोगाचा पूर्ण लाभ होऊ शकतो.
-
ज्योतिषांच्या मते, जर शनि, वाईट भावनांचा स्वामी होऊन त्याच ठिकाणी गेला तर विपरीत राजयोग तयार होतो. जाणून घ्या कोणत्या राशीच्या लोकांना शनिदेवाच्या या संक्रमणामुळे आर्थिक लाभ होऊ शकतो आणि करिअरमध्ये यश मिळू शकते.
-
कर्क राशीतील आठव्या घराचा स्वामी शनि आहे. १७ जानेवारीला या घरात शनिदेव भ्रमण करतील. शनि जेव्हा आठव्या भावात प्रवेश करेल तेव्हा ‘विपरीत राजयोग’ तयार होईल.
-
दरम्यान, या काळात कर्क राशीच्या लोकांना मान-सन्मानात मोठे पद मिळू शकते. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. तसेच, परदेश प्रवासाची शक्यता आहे.
-
कन्या राशीच्या सहाव्या घराचा स्वामी शनि असून या घरात शनिदेवाचे संक्रमण होणार आहे. यामुळे ‘विपरीत राजयोग’ तयार होईल. शनि संक्रमण काळात कन्या राशीच्या लोकांना कोर्ट-कचेरीच्या प्रकरणांमध्ये दिलासा मिळू शकतो.
-
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर, जुन्या आजारापासून मुक्ती मिळू शकते. नोकरदार लोकांना प्रमोशन मिळण्याचीही शक्यता आहे.
-
शनिचा कुंभ राशीत प्रवेश होताच धनु राशीच्या लोकांची शनिच्या साडेसतीपासून सुटका होऊ शकते. धनु राशीच्या तिसर्या घराचा स्वामी शनि असून या घरात त्याचे संक्रमण होईल.
-
या काळात धनु राशीच्या लोकांच्या धैर्य आणि पराक्रमात वाढ होण्याची संभावना आहे. या दिवसांमध्ये हे लोक जोखमीचे निर्णय घेऊ शकतात. नोकरदारांना पदोन्नतीसह उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.
Photos: २०२३ सुरुवातीलाच शनिदेव तयार करणार ‘विपरीत राजयोग’; नववर्षात ‘या’ राशींचे चमकू शकते नशीब
Shani transit 2023: कुंभ राशीत शनिच्या आगमनामुळे काही राशींसाठी ‘विपरीत राजयोग’ तयार होणार आहे. या राशींच्या लोकांना विपरीत राजयोगाचा पूर्ण लाभ होऊ शकतो.
Web Title: Shani dev will create viparit rajayoga at the beginning of 2023 in the new year luck of these zodiac signs can shine pvp