• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. gurudev will make hans panch mahapurush yoga in 2023 four signs have a strong chances of sudden financial gain with good fortune pvp

नव्या वर्षात गुरुदेव बनवणार ‘हंस पंच महापुरुष योग’; ‘या’ चार राशींना भाग्योदयासह आकस्मिक धनलाभाचे प्रबळ योग

वर्ष २०२३ मध्ये गुरु ग्रह संक्रमण करणार असून यामुळे ‘हंस पंच महापुरुष योग’ तयार होणार आहे. या योगामुळे चार राशींच्या लोकांना आकस्मिक धनलाभ आणि प्रगतीचे योग तयार होऊ शकतात.

Updated: December 26, 2022 12:48 IST
Follow Us
  • Hans Rajyog
    1/9

    वैदिक ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये राजयोग असतो, तो राजासारखे जीवन जगतो. याचाच अर्थ असा की त्या व्यक्तीला सर्व भौतिक सुख प्राप्त होतात. अनेक ग्रह वेळोवेळो इतर ग्रहांशी संयोग करून राजयोग तयार करतात. याचा प्रभाव संपूर्ण मनुष्य प्रजातीवर पडत असतो.

  • 2/9

    वर्ष २०२३ मध्ये गुरु ग्रह संक्रमण करणार असून यामुळे ‘हंस पंच महापुरुष योग’ तयार होणार आहे. या योगामुळे चार राशींच्या लोकांना आकस्मिक धनलाभ आणि प्रगतीचे योग तयार होऊ शकतात. या राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.

  • 3/9

    मेष राशीच्या लोकांसाठी ‘हंस पंच महापुरुष योग’ शुभ सिद्ध होऊ शकतो. या राशीच्या कुंडलीच्या लग्न घरामध्ये गुरु ग्रह संक्रमण करणार असून या काळात या लोकांना पितृ संपत्तीचा लाभ होण्याची शक्यता आहे.

  • 4/9

    त्याचबरोबर एखादी महत्त्वपूर्ण योजना लागू करण्यासाठी हा कालावधी उत्तम ठरू शकतो. या दिवसांमध्ये या लोकांना जोडीदारचे संपूर्ण सहकार्य मिळू शकते.

  • 5/9

    तूळ राशीच्या लोकांसाठी हा योग अनुकूल ठरू शकतो. या राशीच्या कुंडलीच्या सातव्या घरात गुरु ग्रह प्रवेश करणार असल्याने या लोकांचे वैवाहिक संबंध मजबूत होऊ शकतात.

  • 6/9

    येणाऱ्या वर्षात या राशीच्या लोकांना कोणतीही नवी ऑर्डर द्यायची असेल किंवा नव्या टेंडरसाठी आवेदन करायचे असल्यास हा कालावधी शुभ ठरू शकतो. तसेच राजकरणाशी निगडीत लोकांची या काळात पदोन्नती होऊ शकते.

  • 7/9

    सिंह राशीच्या लोकांना या योगाचा आर्थिकदृष्ट्या फायदा होण्याची संभावना आहे. गुरु ग्रह या राशीच्या कुंडलीतील नवव्या घरात संक्रमण करत असल्याने या काळात या लोकांना नाशिबाची साथ मिळू शकते. तसेच, या दिवसांमध्ये धार्मिक कार्यांमधील रस वाढू शकतो. विदेश प्रवासाचे योग तयार होण्याची शक्यता आहे.

  • 8/9

    ज्योतिषशास्त्रानुसार, मीन राशीच्या कुंडलीतील दुसऱ्या ग्रहात गुरु ग्रह संक्रमण करणार असून यामुळे आकस्मिक धनलाभ होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर नोकरी बदलण्याच्या विचारात असलेले नोकरदारांना यश मिळू शकते. रखडलेले पैसे या काळात परत मिळू शकतात. तसेच, जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची संभावना आहे.

  • 9/9

    येथे देण्यात आलेली माहिती गृहितके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.

TOPICS
ज्योतिषशास्त्रAstrologyज्योतिषशास्त्र आणि राशीभविष्यAstrology And Horoscope

Web Title: Gurudev will make hans panch mahapurush yoga in 2023 four signs have a strong chances of sudden financial gain with good fortune pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.