• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. mesh rashi personality aries people cant stand insulting themselves at all also expect these things from their partner pvp

मेष राशीचे लोक अजिबात सहन करू शकत नाहीत स्वतःचा अपमान; जोडीदाराकडूनही करतात ‘या’ गोष्टींची अपेक्षा

मेष राशीच्या लोकांना आपल्या जीवनसाथीमध्ये कोणते गुण हवे असते ते जाणून घेऊया.

January 16, 2023 18:48 IST
Follow Us
  • mesh personality
    1/15

    ज्योतिषशास्त्रानुसार, मेष राशीचे लोक महत्वाकांक्षी, दृढनिश्चयी आणि कामाप्रति प्रेरित असतात. असे लोक गोष्टी फार गांभीर्याने घेण्यावर विश्वास ठेवत नाहीत.

  • 2/15

    जेव्हा गोष्ट स्वप्नांचा पाठलाग करण्याची आणि ध्येय साध्य करण्याची असते तेव्हा मेष राशीच्या लोकांना कोणीही थांबवू शकत नाही. हे लोक जोखीम पत्करणारे असतात, त्यामुळे सोप्या गोष्टी करण्यात त्यांना रस नसतो.

  • 3/15

    मेष राशीचे लोक कोणालाही घाबरत नाहीत. ते निर्भय आणि धैर्यवान असतात. या लोकांना आपल्या जोडीदाराकडून खूप अपेक्षा असतात. त्यांना आपल्या जोडीदारामध्ये विशिष्ट गुण हवे असतात. मेष राशीच्या लोकांना आपल्या जीवनसाथीमध्ये कोणते गुण हवे असते ते जाणून घेऊया.

  • 4/15

    मेष राशीच्या लोकांना स्वतःला आणि आपला परिसर स्वच्छ ठेवायला आवडतो. कोणतेही काम पूर्ण करताना ते अतिशय नीटनेटके राहण्याचा प्रयत्न करतात.

  • 5/15

    या राशीच्या लोकांचे डोळे आणि कान नेहमी उघडे असतात. या लोकांना कोणतेही काम दिले तरीही ते पूर्ण करतील परंतु त्यांचे प्राधान्य नेहमीच सुरक्षिततेला असते.

  • 6/15

    मेष राशीचे लोक कोणत्याही आव्हानातून मागे हटत नाहीत. त्यामुळे त्यांच्या जोडीदारामध्येही हाच गुण असावा असे त्यांना वाटते. त्यांचा जोडीदार त्यांच्यासारखा जोखीम घेणारा असावा आणि त्याच्यात उत्साह आणि उत्कटता असावी, असे त्यांना वाटते.

  • 7/15

    मेष राशीचे लोक खूप मेहनती आणि कोणत्याही कामात खूप समर्पित असतात. आपले ध्येय साध्य करण्यासाठी ते कठोर परिश्रम करण्यास मागेपुढे पाहत नाहीत.

  • 8/15

    त्यांना असे वाटते की आपला जोडीदारही त्यांच्या कामासाठी तितकाच वचनबद्ध असावा आणि त्याने काम करताना कोणतीही सीमा ओलांडण्यास घाबरू नये अशी त्यांची अपेक्षा असते.

  • 9/15

    या राशीचे लोक आपले म्हणणे मांडण्यात तत्पर असतात. ते खूप प्रामाणिक असतात आणि आपल्यासारखाच स्पष्ट बोलणाऱ्या जोडीदाराच्या शोधात असतात.

  • 10/15

    मेष राशीचे लोक त्यांच्या स्वभावासाठी ओळखले जातात. म्हणूनच त्यांना अशा जोडीदाराची गरज असते ज्याच्याकडे त्यांचे मूड सांभाळण्याचा संयम असेल. जेव्हा असे होत नाही तेव्हा त्यांना अस्वस्थ वाटते आणि त्यांच्या नात्यातील अंतरही वाढते.

  • 11/15

    मेष राशीच्या लोकांना सहज राग येतो आणि ते अपमान सहन करू शकत नाहीत. हट्टी असण्याव्यतिरिक्त, ते सहसा त्यांच्या चुका स्वीकारत नाहीत. जोपर्यंत त्यांना मोठी किंमत मोजावी लागत नाही तोपर्यंत ते त्यांची चूक मान्य करत नाहीत.

  • 12/15

    या राशीच्या पुरुषांना त्यांची पत्नी सतत सक्रिय आणि आकर्षक असावी असे वाटते. मेष राशीला प्रेमात पूर्ण खात्री हवी असते. म्हणूनच मेष राशीचे लोक प्रेमात अंशतः यशस्वी होतात.

  • 13/15

    ते त्यांच्या जीवनसाथीबाबत अतिशय आदर्शवादी असतात, त्यामुळे पती-पत्नीच्या नात्यात वाद होऊ शकतात. मेष राशीच्या लोकांना समाजात मानाचे स्थान असते.

  • 14/15

    मेष राशीच्या लोकांना अशा क्षेत्रांमध्ये रस असतो जिथे जास्त मेहनत करावी लागत नाहीत परंतु चांगले उत्पन्न मिळते. याशिवाय ते अभिनय, नृत्य अशा कलांमधूनही आपली प्रतिभा दाखवतात. (All Photos: Pexels)

  • 15/15

    येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.

TOPICS
ज्योतिषशास्त्रAstrologyज्योतिषशास्त्र आणि राशीभविष्यAstrology And Horoscope

Web Title: Mesh rashi personality aries people cant stand insulting themselves at all also expect these things from their partner pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.