-
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी राशी बदलतात. ज्याचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येतो.
-
ग्रहांच्या बदलामुळे लोकांच्या जीवनात महत्त्वाचे बदल दिसून येत आहेत. त्याचबरोबर काही लोकांना फायदा होतो, तर काहींना तोटा सहन करावा लागतो.
-
या वर्षी दोन मोठ्या ग्रहांची राशी बदलणार आहे. ज्यामध्ये कर्म दाता शनिदेव १७ जानेवारीला गोचर करतील.
-
तर गुरु बृहस्पति एप्रिलच्या सुरुवातीला राशीत बदल करतील. ज्यामुळे ३ राशीच्या लोकांना धन, सुख मिळू शकते. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या राशी
-
कर्क राशी- गुरू आणि शनिचा राशी बदल तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकतात. या वर्षी तुम्हाला सर्व भौतिक सुख प्राप्त होऊ शकतात. जुन्या गुंतवणुकीतून फायदा होण्याचीही शक्यता आहे.
-
देव गुरु बृहस्पती तुमच्या कार्य घरावर विराजमान असतील. यासोबतच त्याची दृष्टी तुमच्या संक्रमण कुंडलीतील कर्म भावावर पडेल. तर सप्तम दृष्टी तुमच्या वाहनावर आणि सुखाच्या घरावर असेल.
-
तूळ राशी-तूळ राशीच्या लोकांसाठी शनि आणि गुरूचा संयोग लाभदायक ठरू शकतो. कारण शनिदेव तुमच्या कुंडलीच्या पाचव्या घरात प्रवेश करेल. म्हणूनच शनिदेव तुम्हाला उदंड आयुष्य देऊ शकतात.
-
तुम्ही यावेळी नवीन घर देखील खरेदी करू शकता. तसेच, तुम्ही प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करून पैसे कमवू शकता. दुसरीकडे, जे विद्यार्थी परदेशी संस्थांमध्ये शिक्षण घेण्यास इच्छुक आहेत त्यांच्यासाठी हा कालावधी फायदेशीर सिद्ध होईल.
-
धनू राशी- गुरु आणि शनिदेव यांचे संक्रमण तुमच्यासाठी शुभ आणि फलदायी ठरू शकते. या वर्षी तुम्हाला वाहन, जमीन-मालमत्ता प्राप्त होऊ शकते. तसेच, गुरु आणि शनिदेव तुम्हाला धनलाभाची संधी उपलब्ध करून देऊ शकतात.
-
तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळू शकतो. शनिदेवाच्या संक्रमणानेच यावेळी तुम्हाला शनि साडेसती पासून मुक्ती मिळू शकते. नोकरदार लोकांनाही त्यांच्या मेहनतीचे फळ मिळण्याची शक्यता आहे.
-
(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीच्या आधारे लिहिण्यात आला आहे)
येत्या तीन महिन्यात ‘या’ राशी होतील श्रीमंत? शनि-गुरूच्या युतीने लाभू शकतो बक्कळ पैसा
Guru Saturn Gochar 2023: या वर्षी दोन मोठ्या ग्रहांची राशी बदलणार आहे. ज्यामुळे ‘या’ राशीचे लोकं अपार श्रीमंत होऊ शकतात. चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी.
Web Title: Saturn and jupiter transit 2023 will make this sign rich in the next three months shani jupiter alliance can bring a lot of money pdb