-
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी मार्गी आणि वक्री होतात. याचा परिणाम मानवी जीवनावर दिसून येतो. व्यापार आणि बुद्धिमत्तेचा दाता बुध धनु राशीत मार्गी होणार आहे.
-
१८ जानेवारी रोजी बुध ग्रह मार्गी होणार असून याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर होईल. पण तीन राशीच्या लोकांचे चांगले दिवस सुरू होऊ शकतात. चला जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.
-
सिंह राशीच्या लोकांसाठी बुधाचे संक्रमण लाभदायक ठरू शकते. या राशीच्या पाचव्या घरात बुध ग्रहाचे संक्रमण होणार आहे. हे संतान, प्रेम आणि उच्च शिक्षणाचे स्थान मानले जाते. यामुळे जे विद्यार्थी परदेशात शिक्षण घेण्यास इच्छुक आहेत, त्यांच्यासाठी हा कालावधी फायदेशीर ठरू शकतो.
-
याबरोबरच या लोकांचे आपल्या मुलांबरोबरचे संबंध चांगले होऊ शकतात आणि मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. तसेच यावेळी जुन्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. दुसरीकडे, या काळात प्रेमसंबंधांमध्ये यश येऊ शकते.
-
तूळ राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाचे संक्रमण शुभ आणि फलदायी ठरू शकते. कारण बुध ग्रह या राशीतून तिसऱ्या घरात प्रवेश करणार आहे. हे धैर्य आणि शौर्याचे स्थान मानले जाते. त्यामुळे यावेळी कामाच्या ठिकाणी या लोकांचे धैर्य आणि पराक्रम वाढू शकते.
-
तसेच कुटुंबासोबत चांगला वेळ घालवता येईल आणि घरगुती जीवन चांगले होईल. त्याचबरोबर भाऊ-बहिणीचे सहकार्य मिळू शकते. त्याच वेळी, या कालावधीत मालमत्ता खरेदी करू शकता. यामध्ये नफा मिळण्याची शक्यता आहे.
-
धनु राशीच्या लोकांसाठी बुधाचे संक्रमण आर्थिक आणि वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने उत्कृष्ट सिद्ध होऊ शकते. कारण १७ जानेवारीपासून धनु राशीच्या लोकांना शनि साडेसातीपासून मुक्ती मिळणार आहे. तसेच, यावेळी या लोकांची आर्थिक स्थिती सुधारू शकते.
-
दुसरीकडे, वैवाहिक जीवनातील संबंध मधुर होऊ शकतात. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्या लोकांना मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. तसेच, जे अविवाहित आहेत त्यांना आनंदाची बातमी मिळू शकते. यावेळी आरोग्यही सुधारू शकते.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.
१८ जानेवारीपासून चमकू शकते ‘या’ तीन राशींचे नशीब; बुधदेवांच्या मार्गी अवस्थेमुळे तयार होऊ शकते बक्कळ धनलाभाची संधी
१८ जानेवारी रोजी बुध ग्रह मार्गी होणार असून याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर होईल. पण तीन राशीच्या लोकांचे चांगले दिवस सुरू होऊ शकतात.
Web Title: The luck of these three zodiac signs can shine from january 18 due to the transit of mercury there can be an opportunity of great wealth pvp