• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. morning afternoon or night what time of day is the most beneficial for drinking milk right time to drink milk is told in ayurveda pvp

सकाळ, दुपार की रात्र… कोणत्या वेळेस दूध प्यायल्याने मिळेल सर्वाधिक फायदा? पाहा, आयुर्वेदात सांगितलेली योग्य वेळ

कोणत्या वेळी दूध प्यावे जेणेकरून आपल्याला त्यातून जास्तीत जास्त पोषक तत्त्वे मिळतील, याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

January 23, 2023 17:38 IST
Follow Us
  • Best Time to Drink Milk
    1/15

    निरोगी आरोग्यासाठी दूध अतिशय आवश्यक आहे. आरोग्यासाठी फायदेशीर असणाऱ्या सुपरफुड्समध्ये दुधाचा समावेश होतो.

  • 2/15

    मूल जन्माला आल्यानंतर दूध हाच त्याचा मुख्य आहार असतो. काळाच्या ओघात आईच्या दुधाऐवजी गाईचे दुध, म्हशीचे दुध हे पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत.

  • 3/15

    लहानपणापासून ते वृद्धापकाळापर्यंत दूध हा आपल्या आहाराचा महत्त्वाचा भाग आहे. दुधाच्या सेवनाने शरीरात प्रथिने तयार होतात आणि या प्रथिनांमुळे शरीराच्या अवयवांचा विकास होतो.

  • 4/15

    दुधामध्ये केवळ प्रथिनेच नाही तर कॅल्शियम, थायामिन, निकोटिनिक अ‍ॅसिड आणि अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट असतात. यामुळे हाडे तसेच स्नायूंना मजबूत करतात.

  • 5/15

    आयुर्वेदातही असे सांगण्यात आले आहे की प्रत्येक व्यक्तीने आपल्या दैनंदिन आहारात दुधाचा समावेश करायला हवा. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि छातीत जळजळ होण्याची समस्या उद्भवत नाही.

  • 6/15

    दूध अधिक चवदार बनवण्यासाठी तुम्ही त्यात हळद घालू शकता. याशिवाय त्यात स्वीटनरही टाकता येते. मुलांसाठी दुधात चॉकलेट पावडर मिसळणे योग्य ठरू शकते.

  • 7/15

    शरीरातील हाडे, दात आणि स्नायूंसाठी दूध आवश्यक आहे. काही लोक सकाळी दूध पितात तर काही लोक रात्री झोपताना पण तुम्हाला माहित आहे का दूध पिण्याची योग्य वेळ कोणती आहे.

  • 8/15

    कोणत्या वेळी दूध प्यावे जेणेकरून आपल्याला त्यातून जास्तीत जास्त पोषक तत्त्वे मिळतील, याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

  • 9/15

    टाइम्स ऑफ इंडियाच्या एका बातमीनुसार, मुलांमध्ये आणि प्रौढांसाठी दूध पिण्याची योग्य वेळ वेगवेगळी असते. या बातमीमध्ये सांगितले आहे की आयुर्वेदानुसार प्रौढ माणसांनी रात्री झोपण्यापूर्वी दूध प्यावे तर मुलांनी फक्त सकाळी दूध प्यावे.

  • 10/15

    आयुर्वेदानुसार रात्री दूध प्यायल्याने शरीराला अधिक ताकद मिळते. यामुळे दुधाचे पचन व्यवस्थित होते. म्हणजे रात्री दूध प्यायल्याने दुधापासून जास्तीत जास्त पोषक तत्वे मिळतात.

  • 11/15

    त्याचबरोबर रात्री दूध प्यायल्याने झोपही चांगली लागते. रात्री खूप कमी शारीरिक हालचाली होत असल्याने, दुधापासून कॅल्शियमदेखील सर्वात जास्त मिळते.

  • 12/15

    दुसरीकडे, मुलांना सकाळी दूध दिल्याने त्यांना दिवसभर ऊर्जा मिळते. दूध शरीराला पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि प्रथिने यांसारखे अनेक पोषक घटक पुरवते.

  • 13/15

    आयुर्वेदानुसार रात्री गरम दूध प्यायल्याने पचनशक्ती मजबूत राहते. रात्री दूध प्यायल्याने शरीरात ट्रिप्टोफॅन नावाचे अमिनो अ‍ॅसिड निघते, ज्यामुळे झोप येण्यास मदत होते.

  • 14/15

    दुसरीकडे, प्रौढांनी रात्री दूध प्यायल्यास ते तणाव आणि नैराश्यापासूनही दूर राहतात. (फोटो: Freepik)

  • 15/15

    हेही पाहा: ओठांवरील तिळाच्या मदतीने समजेल व्यक्तीच्या जीवनातील गुपित; जाणून घ्या, काय सांगतं सामुद्रिक शास्त्र

TOPICS
दूधMIlkलाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle News

Web Title: Morning afternoon or night what time of day is the most beneficial for drinking milk right time to drink milk is told in ayurveda pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.