-
ज्योतिषशास्त्रामध्ये धातू आणि ग्रहांचा विशिष्ट संबंध असल्याचे सांगण्यात आले आहे. उदाहरणार्थ चांदी हा धातू चंद्राशी संबंधित मानला जातो. तर सोन्याचा संबंध गुरु ग्रहाशी मानला जातो.
-
त्याचबरोबर अनेक लोक आपल्या आवडीनुसार अंगावर भरपूर सोने घालतात. मात्र ज्योतिषशास्त्रात याला चूक मानले गेले आहे. असे मानले जाते की सोने हे प्रत्येक व्यक्तीसाठी शुभ नसते. यासोबतच सोने धारण केल्याने आर्थिक नुकसानही होऊ शकते.
-
आज आपण जाणून घेऊया की शास्त्रानुसार कोणासाठी हे सोने धारण करणे शुभ आणि कोणासाठी अशुभ…
-
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ज्या लोकांचा जन्म मेष, कर्क, सिंह आणि धनु राशीत झाला आहे. या लोकांसाठी सोने परिधान करणे शुभ मानले जाते.
-
दुसरीकडे, शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर सोने परिधान केल्याने वेगवेगळे परिणाम होतात. उदाहरणार्थ, गळ्यात सोने धारण केल्याने, गुरु ग्रह कुंडलीच्या चढत्या घरात आपला प्रभाव दाखवतो.
-
कुंडलीत गुरु ग्रह सकारात्मक आणि उच्च असेल तर व्यक्ती सोने धारण करू शकते. तसेच जर कुंडलीत गुरु ग्रह कमकुवत असेल तरी सोने परिधान करता येते.
-
ज्योतिषशास्त्रानुसार वृषभ, मिथुन, वृश्चिक आणि कुंभ राशीच्या लोकांनी सोने परिधान करणे टाळावे. तसेच ज्यांना लठ्ठपणाचा त्रास आहे त्यांनी सोने परिधान करणे टाळावे.
-
गुरूच्या प्रभावामुळे ही समस्या आणखी वाढू शकते, असे सांगितले जाते. याउलट ज्या लोकांच्या कुंडलीत शनि अशुभ स्थितीत आहे, अशा लोकांनी सोने परिधान करणे टाळावे. असे केल्याने कोणतेही मोठे नुकसान टाळता येते.
-
ज्योतिषशास्त्रात दिलेल्या माहितीनुसार, जर तुम्ही हातात सोन्याची अंगठी घालत असाल तर लोखंडाचे किंवा अन्य धातूचे दागिने घालणे टाळा.
-
तसेच सोन्याची अंगठी हरवणे हे अशुभाचे लक्षण मानले जाते. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीने त्याबद्दल नेहमी सावधगिरी बाळगली पाहिजे.
-
दुसरीकडे, ज्या लोकांना पोटाशी संबंधित कोणतीही समस्या आहे, अशा लोकांनीही सोने परिधान करणे टाळावे. जर तुम्ही पुखराज घातला असाल तर तुम्ही त्याला सोन्याच्या धातूमध्ये जडवूनही घालू शकता.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. (Freepik)
Gold Astrology: ‘या’ लोकांनी सोन्याचे दागिने घालणे ठरेल अशुभ? जाणून घ्या, जोतिषशास्त्रात नक्की काय सांगितलं आहे
आज आपण जाणून घेऊया की ज्योतिष शास्त्रानुसार कोणासाठी हे सोने धारण करणे शुभ आणि कोणासाठी अशुभ…
Web Title: These people should not wear gold jewellery know what exactly is said in astrology pvp