• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. lack of daily sleep can cause diabetes follow these simple tips from experts for better sleep pvp

Diabetes: रोजची कमी झोप मधुमेहासाठी ठरू शकते कारणीभूत; चांगली झोप लागण्यासाठी तज्ज्ञांनी सांगितल्या सोप्या टिप्स

मधुमेहाच्या रुग्णांसाठी रात्रीची झोप खूप महत्त्वाची असते. तज्ज्ञांकडून जाणून घेऊया रात्रीच्या झोपेचा रक्तातील साखरेवर कसा परिणाम होतो.

February 10, 2023 10:44 IST
Follow Us
  • good sleep tips
    1/12

    मधुमेही रुग्णांच्या रक्तातील साखर सकाळी सर्वात जास्त वाढते. मानवांमधील सर्कॅडियन लयनुसार, मधुमेही रुग्णांच्या रक्तातील साखरेची पातळी सकाळी जास्त असते. रात्री ७-८ तासांच्या विश्रांतीनंतर सकाळी रक्तातील साखरेची पातळी वाढू लागते.

  • 2/12

    रात्री आपण झोपलेले असताना रक्तातील साखरेचे प्रमाण कमी-जास्त होणे सामान्य आहे. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी रात्रीची झोप योग्य प्रकारे घेणे अत्यंत आवश्यक आहे. पण लोकांचे गॅजेट्स वापरण्याचे प्रमाण वाढत चालल्यामुळे रात्री उशिरापर्यंत जागे राहण्याचे प्रमाणही वाढले आहे.

  • 3/12

    रात्री कमी झोपेचा थेट परिणाम रक्तातील साखरेवर होतो. कमी झोपेमुळे रक्तातील साखरेची पातळी तर वाढतेच पण लठ्ठपणाही वाढतो. मधुमेही रुग्णांसाठी या दोन्ही गोष्टी वाईट आहेत. रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी रात्री ७-८ तासांची झोप अत्यंत आवश्यक आहे.

  • 4/12

    मधुमेहाच्या रुग्णांच्या रक्तातील साखर वाढल्यास त्यांना अनेक आजार होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. मधुमेहाच्या रुग्णांनी शरीर सक्रिय ठेवावे, आहाराची काळजी घ्यावी आणि रात्री पूर्ण झोप घ्यावी.

  • 5/12

    तज्ज्ञांच्या मते, मधुमेहाच्या रुग्णांसाठी रात्रीची झोप खूप महत्त्वाची असते. तज्ज्ञांकडून जाणून घेऊया रात्रीच्या झोपेचा रक्तातील साखरेवर कसा परिणाम होतो.

  • 6/12

    इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, स्पर्श हॉस्पिटलचे सल्लागार एंडोक्राइनोलॉजिस्ट डॉ. श्याम सुंदर सीएम यांनी सांगितले की, कॉर्टिसोल हार्मोनच्या जास्त सक्रियतेमुळे मधुमेही रुग्णांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण सकाळी ६ ते सकाळी १० या वेळेत जास्त राहते आणि नंतर हळूहळू कमी होते.

  • 7/12

    रात्री पुरेशी झोप न मिळाल्यास तणाव वाढू लागतो आणि यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू लागते. सकाळी ६ ते १० या वेळेत साखरेची पातळी वाढल्याने आजारांचा धोका जास्त असतो.

  • 8/12

    मधुमेहाच्या रुग्णांनी शांत झोपण्यासाठी खालील टिप्स पाळल्या पाहिजेत.

  • 9/12

    मेदांता हॉस्पिटलचे पेडियाट्रिक एंडोक्राइनोलॉजीचे सल्लागार डॉक्टर लोकेश शर्मा यांच्या अहवालानुसार, झोपण्याच्या काही तास आधी स्क्रीनपासून दूर राहा जेणेकरून तुम्हाला शांत झोप मिळेल.

  • 10/12

    झोपण्यापूर्वी मोबाईल बंद ठेवा. रात्री झोपल्यानंतर फोनची गरज भासत नाही, त्यामुळे रात्री फोन बंद ठेवा. रात्री मेसेज किंवा कॉल आल्याने तुमची झोपमोड होऊ शकते.

  • 11/12

    झोपण्यापूर्वी पाणी पिणे टाळा. झोपायच्या आधी पाणी प्यायल्याने लघवी करण्यासाठी रात्री पुन्हा पुन्हा उठावे लागेल.

  • 12/12

    झोपेचे आणि उठण्याचे नियमित वेळापत्रक बनवा. वेळेवर उठणे आणि वेळेवर झोपणे यामुळे समस्या कमी होईल. (Photos: Freepik)

TOPICS
ब्लड शुगरBlood SugarमधुमेहDiabetesहाय ब्लड शुगर कंट्रोल टिप्स

Web Title: Lack of daily sleep can cause diabetes follow these simple tips from experts for better sleep pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.