-
ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह विशिष्ट अंतराने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. या राशी परिवर्तनाचा प्रभाव सर्व मानव जातीवर दिसून येतो. तसेच हा बदल काही व्यक्तींसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ सिद्ध होऊ शकतो.
-
१३ फेब्रुवारीला सूर्याने आपली राशी बदलून मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश केला आहे. तिथे आधीच शनिदेव उपस्थित असल्याने कुंभ राशीमध्ये या दोन ग्रहांची युती तयार होत आहे.
-
ज्योतिष शास्त्रात सांगितल्यानुसार सूर्य आणि शनिदेव यांच्यात शत्रुत्वाची भावना आहे. म्हणूनच तीन राशीच्या लोकांना १५ मार्चपर्यंत काळजी घ्यावी लागणार आहे. या राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.
-
कुंभ राशीच्या लोकांसाठी शनि आणि सूर्यदेवाची युती हानिकारक ठरू शकते. या काळात या लोकांना तोंड आणि घशासंबंधी काही समस्या जाणवू शकतात. शरीरात संसर्ग होऊ शकतो.
-
त्याच वेळी, चांगले सुरू असलेले काम खराब होऊ शकते. कारण ही युती या राशीच्या लग्न घरात तयार होत आहे. त्याचबरोबर या काळामध्ये जोडीदाराचे आरोग्यही बिघडू शकते. जोडीदारासोबत काही विषयांवर मतभेद होऊ शकतात.
-
मकर राशीच्या लोकांसाठी शनि आणि सूर्याची युती प्रतिकूल ठरू शकते. कारण ही युती या राशीतून दुसऱ्या घरात निर्माण होत आहे. यासोबतच शनिदेव हा या राशीच्या संक्रमण कुंडलीत लग्न घराचा स्वामी आहे. म्हणूनच या काळात या लोकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी.
-
या दिवसांमध्ये सर्दी, खोकला, ताप येऊ शकतो. यासोबतच या लोकांना शनिच्या साडेसातीचाही सामना करावा लागू शकतो. त्यामुळे यावेळी व्यवसाय यावेळी मंद गतीने चालण्याची संभावना आहे. तसेच, एखादा करार अंतिम होत असताना रखडला जाऊ शकतो.
-
शनि आणि सूर्याची युती कर्क राशीसाठी हानिकारक ठरू शकते. कारण ही युती या राशीतून आठव्या घरात तयार होत आहे. तसेच शनिदेव या राशीच्या सातव्या आणि आठव्या घरचा स्वामी आहे.
-
यावेळी शनिदेव येथे मार्केशदेखील आहेत. म्हणूनच यावेळी ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. तसेच स्वतःच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. (File Photos)
१५ मार्चपर्यंत ‘या’ राशीच्या लोकांना सहन करावा लागू शकतो प्रचंड त्रास; सूर्य-शनिच्या अशुभ योगामुळे वाढू शकतात अडचणी
ज्योतिष शास्त्रात सांगितल्यानुसार सूर्य आणि शनिदेव यांच्यात शत्रुत्वाची भावना आहे. म्हणूनच तीन राशीच्या लोकांना १५ मार्चपर्यंत काळजी घ्यावी लागणार आहे.
Web Title: Till 15th march people of this sign may have to bear a lot of trouble due to inauspicious yoga of surya shani sun saturn problems may increase pvp