Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. diabetes take care of this things eating sweets blood sugar will not increase learn easy tips from experts pvp

Diabetes: मिठाई खाताना फक्त ‘ही’ काळजी घेतल्यास नाही वाढणार रक्तातील साखर; तज्ज्ञांकडून जाणून घ्या सोप्या टिप्स

मधुमेहाचा रुग्ण मिठाई अजिबात खाऊ शकत नाही का? आणि जर खाऊ शकतात तर रक्तातील साखर वाढू नये म्हणून काय करावे?

February 24, 2023 10:29 IST
Follow Us
  • diabetes sweet
    1/12

    लग्नसराईच्या काळात जर गोड खाल्ले नाही तर हे समारंभ फिके वाटतात. आपल्या समाजात प्रत्येक शुभ प्रसंगी मिठाई आवर्जून खाल्ली जाते. मात्र अशावेळेस मधुमेही रुग्णांचा खूप गोंधळ होतो.

  • 2/12

    आपल्याकडे गोड खाणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. गोड पदार्थही वेगवेगळ्या स्वरूपात, चवीमध्ये आणि प्रकरांमध्ये उपलब्ध आहेत. मात्र दुर्दैवाने मधुमेही रुग्ण गोड पदार्थापासून लांब पळतात.

  • 3/12

    कधी कधी गोड खाण्याची तीव्र इच्छा होते. पण नाईलाजाने या रुग्णांना गोड खाता येत नाही. आता प्रश्न असा पडतो की मधुमेहाचा रुग्ण मिठाई अजिबात खाऊ शकत नाही का? आणि जर खाऊ शकतात तर रक्तातील साखर वाढू नये म्हणून काय करावे?

  • 4/12

    पद्मश्री पुरस्कार विजेते डॉ. केके अग्रवाल म्हणतात, मधुमेहींनी फ्रक्टोज, ग्लुकोज, सुक्रोज, लॅक्टोज आणि माल्टोज, गॅलेक्टोज आणि सुक्रोजपासून दूर राहावे.

  • 5/12

    डॉ.अग्रवाल सांगतात की, आयुर्वेदानुसार मधुमेहींनी ज्या पदार्थांची चव गोड आहे, तसेच कार्बोहायड्रेट्सपासूनही अंतर ठेवावे. तर कडू आणि मसालेदार पदार्थांचे भरपूर सेवन करावे.

  • 6/12

    त्याचबरोबर आरोग्य तज्ज्ञांच्या मते मधुमेहाचे रुग्ण कधी कधी गोड खाऊ शकतात. रक्तातील साखर नियंत्रित करणारे लोकच हे करू शकतात. रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असलेल्यांनी गोड खाऊ नये. गोड खाल्ल्याने रक्तातील साखर लवकर वाढते. म्हणूनच मिठाई खाताना अनेक खबरदारी घेणे आवश्यक आहे.

  • 7/12

    मिठाई खाण्यापूर्वी फायबर आणि प्रथिनेयुक्त पदार्थ खावे. यानंतर, चरबी आणि कर्बोदकांनी भरपूर पदार्थ खावे. यानंतरच गोड खावे. जर तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुमच्या रक्तातील साखर फार वेगाने वाढणार नाही.

  • 8/12

    डायबेटिक रुग्णांनी रक्तातील साखरेवर फारसा परिणाम होऊ नये म्हणून गोड कमी खावे, असे आहारतज्ज्ञ सांगतात. जास्त साखर खाल्ल्याने रक्तातील साखर वेगाने वाढू शकते; म्हणूनच मिठाई मर्यादित प्रमाणात खा.

  • 9/12

    आरोग्य तज्ज्ञांच्या मते, मधुमेहाच्या रुग्णांनी रिकाम्या पोटी मिठाई अजिबात खाऊ नये. असे केल्याने रक्तातील साखर झपाट्याने वाढते. अशा रुग्णांनी नाश्ता किंवा दुपारच्या जेवणानंतरच मिठाई खावी.

  • 10/12

    मधुमेहाच्या रुग्णांनी फक्त कोरडी मिठाई खावी. थंड पेय आणि गोड रस पूर्णपणे टाळावे. द्रव साखर त्वरीत रक्तातील साखर वाढवू शकते. टाईप १ मधुमेही आणि इन्सुलिन घेणार्‍यांनी कोणत्याही प्रकारची मिठाई खाऊ नये.

  • 11/12

    मधुमेहाच्या रुग्णांना झोपायला त्रास होऊ शकतो आणि वारंवार लघवी होऊ शकते. सकाळी उठल्यावर उलट्या होऊ शकतात. अशा रुग्णांनी रात्री मिठाई खाऊ नये.

  • 12/12

    येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. (सर्व फोटो : Freepik)

TOPICS
ब्लड शुगरBlood SugarमधुमेहDiabetesहाय ब्लड शुगर कंट्रोल टिप्स

Web Title: Diabetes take care of this things eating sweets blood sugar will not increase learn easy tips from experts pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.