• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. horoscope in the month of march the people of these zodiac signs may have to face challenges possibility of financial loss pvp

March Horoscope: मार्च महिन्यात ‘या’ राशीच्या लोकांना करावा लागू शकतो अडचणींचा सामना; आर्थिक नुकसान होण्याची शक्यता

अनेकांसाठी हा महिना शुभ ठरण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर काहींना या महिन्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

March 2, 2023 10:57 IST
Follow Us
  • march 2023 horoscope
    1/15

    मार्च महिन्याची सुरुवात झाली आहे. नवा महिना आपल्यासाठी कसा असणार आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकालाच असते. ज्योतिषशास्त्रानुसार, हा महिना अनेक अर्थाने खास ठरू शकतो.

  • 2/15

    अनेकांसाठी हा महिना शुभ ठरण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर काहींना या महिन्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या महिन्यात हिंदू नववर्षाची सुरुवात होईल तसेच अनेक ग्रह संक्रमणही करतील. याचा वाईट प्रभाव काही राशीच्या लोकांवर पडण्याची शक्यता आहे. (Freepik)

  • 3/15

    मकर : मकर राशीच्या व्यावसायिकांना उधार दिलेले पैसे, परत मिळतील की नाही यांची भीती जाणवू शकते. नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी नीट विचार करावा, कारण आर्थिक नुकसान होऊ शकते.

  • 4/15

    तिसऱ्या व्यक्तीमुळे जोडप्यांमध्ये वाद होण्याची संभावना आहे. छोट्या छोट्या गोष्टींमुळे कुटुंबातील शांतता बिघडू शकते. घरातील शांतता टिकून राहील यासाठी प्रयत्न करावेत.

  • 5/15

    तूळ : तूळ राशीच्या लोकांना करिअरच्या क्षेत्रात आव्हानांना सामोरे जावे लागण्याची संभावना आहे. त्यामुळे सतर्क राहावे. सहकाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. व्यवसायात भागीदारी केल्यास अडचणी येऊ शकतात.

  • 6/15

    विनाकारण खर्चामुळे कुटुंबाचे आर्थिक बजेट बिघडू शकते. महिन्याच्या सुरुवातीला गुंतवणूक करणे टाळावे. सणांचा आनंद लुटताना प्रियजनांबरोबर आनंदी राहावे.

  • 7/15

    सिंह : सिंह राशीच्या लोकांनी आपल्या वागण्या-बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. अहंकार संबंध कमकुवत करू शकतो. कार्यस्थळी आव्हानांना सामोरे जावे लागू शकते.

  • 8/15

    आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगावी. लग्नाच्या बाबतीत घाई करू नये. जोडीदाराशी संभाषण करताना अहंकार दूर ठेवावा.

  • 9/15

    वृषभ : १५ मार्चनंतर वृषभ राशीच्या लोकांना आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. कार्यस्थळी कामाचा ताण असू शकतो. व्यावसायिकांनी आपल्या मालाची गुणवत्ता तपासत राहावी, अन्यथा तोटा सहन करावा लागू शकतो.

  • 10/15

    महिन्याच्या सुरुवातीला काही अडथळ्यांना सामोरे जावे लागू शकते. कुटुंबातील सदस्यांशी वाद होऊ शकतो. पडल्याने डोक्याला व तोंडाला इजा होण्याची शक्यता आहे. (Freepik)

  • 11/15

    कुंभ : कुंभ राशीच्या लोकांनी या महिन्यात घाईत निर्णय घेतल्यास नुकसान होऊ शकते. व्यापार्‍यांनी आपल्या विरोधकांपासून सावध राहावे. विद्यार्थी आणि तरुणांनी आपयश आल्यास खचून जाऊ नये.

  • 12/15

    जोडप्यांमध्ये गंभीर वाद होऊ शकतात. कौटुंबिक जीवनातही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. आर्थिक बाबतीत चणचण जाणवू शकते. तब्येतीच्या बाबतीत निष्काळजीपणा बाळगू नये.

  • 13/15

    मीन : या राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये चढ-उतार दिसू शकतात. विरोधकांपासून सावध राहावे. व्यवसायात कठीण आव्हानांना सामोरे जावे लागू शकते.

  • 14/15

    प्रेमसंबंधात भांडणे होऊ शकतात. वडिलोपार्जित मालमत्तेबाबत मतभेदामुळे घरातील वातावरण तणावपूर्ण राहू शकते. आहारच्या बाबतीत काळजी घ्यावी.

  • 15/15

    येथे देण्यात माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. (File Photos)

TOPICS
ज्योतिषशास्त्रAstrologyज्योतिषशास्त्र आणि राशीभविष्यAstrology And Horoscope

Web Title: Horoscope in the month of march the people of these zodiac signs may have to face challenges possibility of financial loss pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.