-
सामुद्रिक शास्त्रानुसार मानवाच्या शरीरातील अवयवांचा आकार आणि त्यांची रचना यावरून त्यांचा स्वभाव, व्यक्तिमत्त्व आणि भविष्य जाणून घेता येते.
-
आज आपण हाताच्या अंगठ्याच्या आकारावरून व्यक्तीचा स्वभाव आणि भविष्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. हातांच्या बोटांप्रमाणेच अंगठ्यालाही मोठे महत्त्व आहे. अंगठ्याला आपल्या इच्छाशक्तीचे प्रतीक मानले जाते.
-
सामुद्रिक शास्त्राची रचना समुद्र ऋषींनी केली होती. यानुसार, ज्या लोकांचा अंगठा लवचिक असतो ते लोक त्यांच्या करिअरच्या बाबतीत खूप संवेदनशील असतात. ते ज्या ध्येयाचा विचार करतात ते साध्य करूनच स्वस्थ बसतात.
-
सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या लोकांचा अंगठा टोकदार, म्हणजेच मूळ जागी रुंद, मध्यभागी गोलाकार असतात आणि नखांपर्यंत पोचल्यावर टोकदार होतात. अशा लोकांचे व्यक्तिमत्व आकर्षक आणि भावनिक असते. हे लोक थोडे आळशी स्वभावाचे असतात. मात्र हे लोक चांगले मित्र असतात.
-
ज्या लोकांचा अंगठा खालून रुंद आणि वरून गोलाकार असतो ते खूप व्यावहारिक असतात. या लोकांना चांगले खायला आवडते, सुखी जीवन जगणे आवडते. तसेच, त्यांना छान कपडे घालण्याची आवड असते. हे लोक सौंदर्याचे चाहते असतात.
-
सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या लोकांचा अंगठा वरपासून खालपर्यंत सारखाच असतो, ते साधे जीवन जगतात. तसेच, हे लोक प्रामाणिक आणि मेहनती असतात. ते कष्ट करायला घाबरत नाहीत. ते कलाप्रेमीही असतात. तसेच कलेच्या बळावर ते समोरच्या व्यक्तीला आपला चाहता बनवतात.
-
सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या लोकांचा अंगठा छोटा आणि जाड असतो, त्यांची वापर बुद्धी चांगली असते. त्यांना स्वतःवर आत्मविश्वास असतो. तसेच, हे लोक आपल्या जोडीदारावर खूप प्रेम करतात आणि नातेसंबंध चांगल्या प्रकारे निभावतात. यासोबतच हे लोक कलाप्रेमीही असतात.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. (फोटो : Pexels)
-
हेही पाहा : Weight Loss Diet: आवडीचे पदार्थ खाऊनही कमी करता येईल वाढलेलं वजन; जाणून घ्या, काय आहे 80/20 गोल्डन डाएट रूल (Freepik)
Samudrik Shastra: ‘असा’ अंगठा असणारे लोक मानले जातात खूपच भाग्यवान; जाणून घ्या तुमची बोटं तुमच्याबद्दल काय सांगतात
जाणून घ्या, तुमचा अंगठा तुमच्याबद्दल काय सांगतो.
Web Title: Samudrik shastra people with these types of thumb are considered very lucky know what your fingers say about you pvp