-
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका निश्चित अंतराने गोचर करुन युती करतात. ग्रहांची ही युती काहींसाठी सकारात्मक तर काहींसाठी नकारात्मक ठरु शकते.
-
गुरुच्या मीन राशीमध्ये बुध, गुरू आणि सूर्यदेव यांची युती तयार होणार आहे. ज्यामुळे त्रिग्रही योग तयार होईल.
-
ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा जेव्हा ग्रहांचा संयोग होतो तेव्हा हा विशेष प्रभाव काही राशींच्या लोकांवर नक्कीच पडतो.
-
मुख्य म्हणजे हा त्रिग्रही योग बनल्यामुळे तीन राशींच्या लोकांना धन, संपत्ती आणि त्यांच्या कार्यात चांगले यश मिळण्याची प्रबळ शक्यता आहे. पाहूया कोणत्या आहेत, या भाग्यशाली राशी…
-
वृश्चिक राशीतील मंडळीसाठी त्रिग्रही योग शुभ सिद्ध होऊ शकतो. कारण हा योग तुमच्या राशीतून पाचव्या स्थानी तयार होणार आहे, ज्याला अपत्य प्राप्ती, प्रेम-संबंध आणि उच्च शिक्षणास अनुकल मानले जाते. त्यामुळे या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो.
-
तसंच जे लोक अध्यात्माच्या क्षेत्राशी संबंधित आहेत, त्यांना चांगले यश मिळू शकते. शिवाय तुमच्या प्रेम जीवनात चांगल्या गोष्टी घडू शकतात आणि शैक्षणिक क्षेत्रातही प्रगती होऊ शकते. त्याचप्रमाणे तुम्ही कोणत्याही स्पर्धेत भाग घेतला असेल तर तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे.
-
धनु राशीच्या मंडळीसाठी त्रिग्रही योग लाभदायक ठरू शकतो. कारण तुमच्या गोचर कुंडलीच्या चौथ्या स्थानी हा योग तयार होणार आहे. जे भौतिक सुख आणि आईचे स्थान मानले जाते. त्यामुळे तुम्हाला या काळात सर्व भौतिक सुख मिळू शकतात. नव्या नोकरीच्या माध्यमातून चांगले पैसे मिळू शकतात.
-
यासोबतच तुम्हाला मातृपक्षाकडून आनंद आणि लाभ होऊ शकतो. वाहन सुख मिळू शकते तर तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करू शकता. दुसरीकडे, जानेवारीपासून तुम्हाला शनि सतीपासून मुक्ती मिळाली आहे. त्यामुळे आता तुमची रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात.
-
त्रिग्रही योग तयार झाल्यामुळे मीन राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. कारण हा योग तुमच्या लग्न अवस्थेतच तयार होणार आहे. त्यामुळे तुमचे व्यक्तिमत्व सुधारू शकते. यासोबतच तुमचा आत्मविश्वासही वाढू शकतो.
-
या योगाची दृष्टी तुमच्या गोचर कुंडलीच्या सातव्या स्थानी पडणार आहे. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींना नवा व्यवसाय सुरू करायचा असेल तर हा काळ चांगला आणि यशस्वी ठरू शकतो. तसेच तुम्हाला तुमच्या जोडीदाराची उत्तम साथ मिळू शकते आणि अविवाहित व्यक्तींना लग्नाचे प्रस्ताव येण्याची शक्यता आहे.
-
(टीप: वरील लेख हा गृहितके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)
‘पावरफुल त्रिग्रही योग’ बनल्याने ‘या’ राशींना होणार बक्कळ धनलाभ? सूर्य, बुध, गुरुदेवाच्या कृपेने मिळू शकतो अमाप पैसा
Tirgrahi Yog In Meen: ‘पावरफुल त्रिग्रही योगा’मुळे काही राशींच्या लोकांना धन, संपत्ती आणि त्यांच्या कार्यात चांगले यश मिळण्याची प्रबळ शक्यता आहे. चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत, या भाग्यशाली राशी…
Web Title: Surya gochar tirgrahi yog will make in pisces these zodiac sign get huge money bank balance marathi astrology pdb