• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. risk of heat stroke increases due to hot sun include these foods in your diet to protect yourself during summer pvp

कडक उन्हामुळे वाढतोय उष्माघाताचा धोका; उन्हाळ्यात स्वतःचा बचाव करण्यासाठी ‘या’ पदार्थांचा करा आहारात समावेश

उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी आणि आजारांपासून संरक्षण करण्यासाठी कोणते प्रभावी उपाय आहेत ते जाणून घेऊया.

April 18, 2023 11:49 IST
Follow Us
  • summer-heat
    1/15

    उन्हाळ्यात अनेक ठिकाणी तापमान ४० अंशाच्या वर जाते. अशा परिस्थितीत उष्णतेच्या लाटा आपल्या शरीराला झोडपून काढतात. कडक उन्हाळ्यात घरीच राहणे उत्तम असते. पण अशा उन्हात घराबाहेर पडणे अतिशय आव्हानात्मक आहे.

  • 2/15

    घाम येणे, वारंवार तहान लागणे आणि थकवा जाणवणे ही या ऋतूतील सामान्य लक्षणे आहेत. घाम येणे आणि जास्त उष्णता यामुळे निर्जलीकरण होऊ शकते. या ऋतूमध्ये उष्णतेपासून बचाव न केल्यास शरीरातील अनेक आजारांचा धोका वाढू शकतो.

  • 3/15

    उष्णता अचानक वाढल्याने उष्माघात, हीट क्रॅम्प्स, फूड पॉइजनिंग आणि टायफाइड यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

  • 4/15

    या ऋतूमध्ये शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करणे आवश्यक आहे, अन्यथा डोकेदुखी, उलट्या, थकवा, अशक्तपणा, चक्कर येणे अशा तक्रारी होऊ शकतात.

  • 5/15

    उन्हाळ्यात डिहायड्रेशनची समस्या टाळण्यासाठी जास्तीत जास्त द्रवपदार्थाचे सेवन करणे आवश्यक आहे. विशिष्ट प्रकारचे खाद्यपदार्थ आणि द्रव पदार्थांचे सेवन करून, आपण सहजपणे उष्णतेवर मात करू शकता.

  • 6/15

    उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी आणि आजारांपासून संरक्षण करण्यासाठी कोणते प्रभावी उपाय आहेत ते जाणून घेऊया.

  • 7/15

    उन्हाळ्यात शरीरातील डिहायड्रेशनची समस्या वाढू शकते, अशा परिस्थितीत लिक्विड ज्यूसचे सेवन करावे. ज्यूस, जलजीरा, लस्सी, दही आणि मिल्क शेकचे सेवन करून तुम्ही उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवू शकता.

  • 8/15

    शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी तुम्ही पाणी, नारळपाणी, मीठ आणि साखर यांचे द्रावण सेवन करावे.

  • 9/15

    प्रत्येक ऋतूमध्ये प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी व्हिटॅमिन सीचे सेवन करणे आवश्यक आहे. शरीरातील व्हिटॅमिन सीची कमतरता पूर्ण करण्यासाठी लिंबू आणि संत्र्याचे सेवन करा.

  • 10/15

    अँटी-ऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध असलेले व्हिटॅमिन सी मुक्त रॅडिकल्स टाळण्यास मदत करते आणि त्वचेवर सूर्यप्रकाशाचा प्रभाव कमी दिसून येतो.

  • 11/15

    जड जेवण खाल्ल्याने शरीरात उष्णता निर्माण होते आणि अस्वस्थ वाटू शकते. अधिक अन्न खाल्ल्यानंतर, आपल्या शरीराला अन्न पचवण्यासाठी आणि चयापचय करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात.

  • 12/15

    यामुळे शरीराचे तापमान वाढते आणि आपल्याला घाम येतो आणि सुस्त वाटते. म्हणूनच उन्हाळ्यात हलके आणि ताजे शिजवलेले अन्न खा.

  • 13/15

    उन्हाळ्यात भाज्यांच्या रसाचे सेवन त्वचा आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहे. भाज्यांमध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी आढळते जे आपल्या त्वचेच्या आणि केसांच्या आरोग्यासाठी आवश्यक असतात.

  • 14/15

    तुम्ही दररोज कोरफड, पालक, आवळा आणि पुदिन्याचा रस घेऊ शकता.

  • 15/15

    सर्व फोटो : Freepik

TOPICS
लाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Risk of heat stroke increases due to hot sun include these foods in your diet to protect yourself during summer pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.