-
उन्हाळा आला की शरीराला भरपूर पाण्याची आवश्यकता असते. उन्हाळ्यात थंड पेयाकडे आपली धाव असते. आईस्क्रीम तर आपण उन्हाळ्यात खूप आवडीने खातो, मात्र आपल्या आरोग्यासाठी आईस्क्रीम कितपत योग्य आहे, याविषयी आपल्याला काहीच कल्पना नसते. मग आपल्या आरोग्यासाठी काय चांगले आहे ? (फोटो सौजन्य : फ्रिपीक)
-
तुम्हाला माहिती आहे का उन्हाळ्यात एक ग्लास ताक तुमच्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे? आज आपण या विषयीच जाणून घेणार आहोत. (फोटो सौजन्य : फ्रिपीक)
-
डिहायड्रेशन दूर करते
ताक आपल्या शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स आणि फ्लूडची पातळी नियंत्रित ठेवते. उन्हाळ्यात शरीराला पाण्याची खूप जास्त आवश्यकता असते अशात ताक प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते. (फोटो सौजन्य : फ्रिपीक) -
शरीर थंड ठेवते
ताक आपल्या शरीराला आतून थंड ठेवते. ताक आपल्या शरीराचे तापमान आटोक्यात ठेवते. (फोटो सौजन्य : फ्रिपीक) -
बद्धकोष्ठतेला आराम
उपाशी पोटी दररोज सकाळी जर तुम्ही एक ग्लास ताक प्यायल्यास बद्धकोष्ठतेला आराम मिळू शकतो. याशिवाय ताक प्यायल्याने पोटाच्या समस्याही दूर होऊ शकतात. (फोटो सौजन्य : फ्रिपीक) -
हेल्दी पचन क्रिया
हेल्दी पचन क्रियेसाठी ताक हा उत्तम पर्याय आहे. जर पचन क्रिया योग्य असेल तर तुम्ही हेल्दी राहू शकता (फोटो सौजन्य : फ्रिपीक) -
वजन कमी होणे
ताकामध्ये फॅट नसलेले न्युट्रीयंट्स असतात त्यामुळे एक ग्लास ताक तुम्हाला तृप्त करते. (फोटो सौजन्य : फ्रिपीक) -
स्किनसाठी उत्तम
ताकामध्ये असलेले Alpha Hydraulic Acid (AHA) आणि Lactic Acid उन्हाळ्यात तुमच्या स्किनला सुरक्षित ठेवते . त्यामुळे उन्हाळ्यात ताक प्यावे. (फोटो सौजन्य : फ्रिपीक) -
उष्माघातापासून आराम
उन्हाळा आला की उष्माघाताचा त्रास हा अनेकांना होतो. उष्माघाताच्या त्रासापासून स्वत:ला वाचवायचं असेल तर दररोज ताक प्या किंवा प्रवासात सोबत एक बॉटल ताक ठेवा. (फोटो सौजन्य : फ्रिपीक)
Buttermilk Benefits : उन्हाळ्यात ताक का प्यावं? फायदे वाचाल तर अवाक् व्हाल
तुम्हाला माहिती आहे का उन्हाळ्यात एक ग्लास ताक तुमच्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे? आज आपण या विषयीच जाणून घेणार आहोत.
Web Title: Why should drink buttermilk in summer read benefits ndj