• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. worlds top trending destinations for solo travelers iehd import hrc

एकटं फिरायला जायचंय? सोलो ट्रिपसाठी जगभरातील सर्वोत्तम १० ठिकाणांची यादी पाहाच!

तुम्हाला एकटं फिरायला आवडत असेल आणि परदेशात सोलो ट्रिपसाठी एखादं उत्तम ठिकाण तुम्ही शोधत असाल तर आम्ही तुमच्यासाठी आणलेली ही यादी एकदा नक्की पाहा.

Updated: June 24, 2023 16:00 IST
Follow Us
  • solo trip
    1/12

    एकट्याने प्रवास करणे हा सर्वात समृद्ध अनुभवांपैकी एक असतो, परंतु तुम्ही पहिल्यांदाच एकटे प्रवास करणार असाल तर तो त्रासदायक देखील ठरू शकतो.

  • 2/12

    त्यामुळे एकट्याने प्रवास करण्यासाठी सुरक्षित ठिकाणं शोधणं आव्हानात्मक असतं. तुम्हीही सोलो ट्रिपसाठी जगभरातील वेगवेगळी ठिकाणं, शहरं शोधत असाल तर आम्ही तुमच्यासाठी त्याची यादी आणली आहे..

  • 3/12



    अभ्यासानुसार, एकट्याने प्रवास करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी व्हिएतनामचे हनोई हे सर्वाधिक सुरक्षित शहर आहे. इथली प्राचीन वास्तुकला, त्याचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, ऐतिहासिक मंदिरं तुम्ही पाहू शकता. याशिवाय इथे तुम्हाला तिथली खाद्यसंस्कृतीही अनुभवता येईल. (फोटो: अनस्प्लॅश)

  • 4/12

    यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे थायलंडची राजधानी बँकॉक. हे शहर सोलो ट्रिपसाठी उत्तम आहे. (फोटो: अनस्प्लॅश)

  • 5/12

    तैवानमधील तैपेई तिसऱ्या क्रमांकावर आहे. तैवानच्या राजधानीत आधुनिक आर्किटेक्चर, निसर्गरम्य ठिकाणं यांचा अनुभव तुम्ही घेऊ शकता. (फोटो: अनस्प्लॅश)

  • 6/12

    या यादीत पुढचे ठिकाण दक्षिण कोरियातील सियोल आहे. इथली आधुनिक वास्तुकला आणि डोंगराळ प्रदेश वेळ घालवण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. (फोटो: अनस्प्लॅश)

  • 7/12

    कंबोडियातील नोम पेन्ह हे शहर या यादीत पाचव्या स्थानावर आहे. “पर्ल ऑफ एशिया” म्हणून ओळखलं जाणारं हे शहर ऐतिहासिक वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे. (फोटो: अनस्प्लॅश)

  • 8/12

    व्हिएतनाममधील हो ची मिन्ह सिटी या यादीत सहाव्या स्थानावर आहे. हे शहर फ्रेंच वसाहती, वास्तुकला, स्ट्रीट लाइफ व समृद्ध ऐतिहासिक संस्कृतीसाठी ओळखले जाते. (फोटो: अनस्प्लॅश)

  • 9/12

    या यादीत मलेशियाची राजधानी क्वालालंपूर सातव्या क्रमांकावर आहे. पेट्रोनास टॉवर्स या जगातील सर्वात उंच जुळ्या इमारती इथेच आहेत. इथली सांस्कृतिक विविधता जगप्रसिद्ध आहे. तुम्ही इथे कमी खर्चात फिरण्याचा आनंद घेऊ शकता. धतेमुळे चालते.(फोटो: अनस्प्लॅश)

  • 10/12

    ऑस्ट्रेलियातील पर्थ शहर आठव्या क्रमांकावर आहे. इथले शांत समुद्र किनारे, निसर्गरम्य उद्याने, गजबजणारी आर्ट गॅलरी आणि ऐतिहासिक ठिकाणं लक्षवेधी आहेत. (फोटो: अनस्प्लॅश)

  • 11/12

    या यादीत सिंगापूर नवव्या स्थानावर आहे. उंच गगनचुंबी इमारती, उद्याने, शॉपिंग मॉल्स आणि मनोरंजनाची आकर्षणे असलेले हे ठिकाण आग्नेय आशियातील प्रमुख पर्यटन स्थळ आहे. (फोटो: अनस्प्लॅश)

  • 12/12

    जगातील टॉप १० ठिकाणांमध्ये ऑस्ट्रेलियातील सिडनीचाही समावेश आहे. समुद्र किनाऱ्यापासून ते आकर्षक ऐतिहासिक ठिकाणं इथे फिरण्यासाठी आहेत. (फोटो: अनस्प्लॅश)

TOPICS
प्रवासTravelफोटो गॅलरीPhoto Galleryलाइफस्टाइलLifestyle

Web Title: Worlds top trending destinations for solo travelers iehd import hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.