-

ज्योतिषशास्त्रात व्यक्तीच्या कुंडलीमध्ये स्थित ग्रहांचे विश्लेषण करून त्याच्या भविष्य आणि स्वभावाचे वर्णन केले जाते.
-
त्याचप्रमाणे, समुद्रशास्त्रामध्ये एखाद्या व्यक्तीच्या शरीरावर असलेल्या खुणा, अवयवांचा आकार आणि रचनेच्याच्या आधारावर त्याचे व्यक्तिमत्व आणि स्वभाव सांगितला जाऊ शकतो.
-
आज आपण व्यक्तीच्या जिभेच्या रचना आणि रंगावरून संबंधित व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व, तिचा स्वभाव आणि तिच्या भविष्याबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू.
-
सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या लोकांची जीभ जाड असते. ते लोक थोडे स्पष्टवक्ते असू शकतात. पण हे लोक मनाने वाईट नसतात. त्याचबरोबर ज्यांना ते आपले मानतात, ते त्याला शेवटपर्यंत साथ देतात.
-
त्याच वेळी, त्यांची संभाषणाची शैली कधीकधी काहीशी आक्रमक होते. म्हणूनच अशा लोकांनी आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे आणि विचार करून आपले म्हणणे लोकांसमोर ठेवावे.
-
ज्या लोकांच्या जिभेवर तीळ असते, असे लोक भाग्यवान मानले जातात. तसेच असेही मानले जाते की हे लोक राजकारणाच्या क्षेत्रात चांगले नाव कमावतात.
-
हे लोक कुशल वक्ते असतात, यासोबतच हे लोक समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करतात. हे लोक थोडे निष्काळजी असू शकतात.
-
सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या लोकांची जीभ लाल असते, ते लोक भाग्यवान मानले जातात. यासोबतच हे लोक बुद्धिमानही असतात. हे लोक त्यांच्या करिअरमध्ये लवकरच चांगले स्थान प्राप्त करतात.
-
अशा लोकांना जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळते. यासोबतच असे लोक उच्च पदावर पोहोचण्यातही यशस्वी ठरतात. त्यांची प्रकृतीही अनेकदा चांगली राहते.
-
पिवळ्या रंगाची जीभ शुभ मानली जात नाही. सामुद्रिक शास्त्रात असे म्हटले आहे की अशी व्यक्ती शारीरिक सुखांपासून वंचित राहू शकते. यासोबतच अशा व्यक्तीचे आरोग्य थोडे खराब राहते. अशा लोकांची तर्कशक्ती देखील कमकुवत असू शकते.
-
सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या लोकांची जीभ दोन रंगाची असते, असे लोक नशा करणारे असू शकतात. तसेच, हे लोक वाईट संगतीत पडू शकतात. असे लोक नियमांचे उल्लंघन देखील करू शकतात. त्याचबरोबर त्यांना आरोग्याबाबतही समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. (Photos: Freepik)
सामुद्रिक शास्त्राने उलगडली अनेक कोड्यांची रहस्य? जाणून घ्या जिभेचा रंग आणि रचना तुमच्याबद्दल काय सांगते
आज आपण व्यक्तीच्या जिभेच्या रचना आणि रंगावरून संबंधित व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व, तिचा स्वभाव आणि तिच्या भविष्याबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू.
Web Title: Samudrik shastra know what your tongue color and texture says about you pvp