-
तुम्हाला पावसाळा आवडतो का? तुम्हाला पावसाळ्यात फिरायला आवडते का? होय तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. पावसात फिरण्याची मज्जा काही वेगळीच असते.
-
पावसाळ्यात प्रवास करणे मजेशीर असले तरी काहीवेळा या हवामानात बाहेर पडणे जरा अवघड असते, खासकरून जर तुम्ही तयारी न करता तेव्हा. जर तुम्ही पावसाळ्यात भारतात फिरण्याचा प्लॅन असेल तर या गोष्टी तुमच्याबरोबर ठेवा.
-
तुम्ही लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी बाहेर जाता किंवा तुमच्या जवळ रेनकोट असणे आवश्यक आहे. लांब ट्रेंच कोट स्टाईलमधील कोट उत्तम आहेत. तुम्ही पँटसहीत रेनकोटही खरेदी करू शकता.
-
पावसाळ्यात अशा ट्रॅव्हल बॅगसह बाहेर जा, जी वॉटर प्रूफ असेल किंवा तुमच्याकडे बॅग कव्हर असेल. तसेच, त्यात अनेक आतील खिसे असावेत जेणेकरून तुमचा फोन, घड्याळ इत्यादी खराब होण्यापासून वाचतील.
-
कपड्यांचे फॅब्रिक आणि स्टाईलही पावसाचा मूड बघूनच ठरवावी. पुरुषांसाठी गुडघ्यापर्यंत पॅन्ट, शॉर्ट्स आणि महिलांसाठी असतील तर अँकल लेंथ स्टाईल निवडा.
-
कपड्यांचे फॅब्रिक असे असावे की ते लवकर सुकेल, अन्यथा, ओल्या कपड्यांमध्ये जास्त वेळ फिरल्याने आजारी पडू शकतो. अतिरिक्त पॉलीबॅग प्लॅस्टिक पिशव्या ठेवा म्हणजे कपडे ओले झाले तर ठेवता येतील.
-
पावसात रस्त्यावर चिखल होतो, हे लक्षात घेऊनच चप्पल-शूज तुमच्याबरोबर घ्या. नेहमी चप्पल-शूजची एक जास्तीची जोडी तुमच्याबरोबर ठेवा.
-
कोणत्याही ऋतूत बाहेर जाताना मच्छरपासून वाचण्यासाठी कॉईल तुमच्याबरोबर ठेवा. विशेषतः पावसाळ्यात. मच्छरपासून वाचण्यासाठी क्रिम बॅगच्या खिशात ठेवा जेथून ते सहज सापडेल.
-
पावसात लाईट गेल्यानंतर मोबाईल चार्ज करण्यात अडचण येऊ शकते, त्यामुळे पॉवर बँक तुमच्याबरोबर ठेवा.
जर तुम्ही पावसाळ्यात फिरायला जात असाल तर ‘या’ गोष्टी नेहमी तुमच्याबरोबर ठेवा
पावसाळ्यात प्रवास करणे मजेशीर असले तरी काहीवेळा या हवामानात बाहेर पडणे जरा अवघड असते, खासकरून जर तुम्ही तयारी न करता तेव्हा..
Web Title: Always keep these things with you if you are going for a walk in monsoons snk