-
सध्या पावसाळा सुरू झाला आहे. अशात कुरकुरीत गरमागरम भजी खावीशी वाटतात. (Photo : freepik)
-
आपल्यापैकी अनेकांना कांदा भजी आवडत असतील पण तुम्ही केलेली कांदा भजी कुरकुरीत होत नसेल तर टेन्शन घेऊ नका कारण आज आम्ही तुम्हाला खास रेसिपी सांगणार आहोत ज्यामुळे कांदा भजी कुरकुरीत अन् टेस्टी होणार. (Photo : YouTube)
-
साहित्य : कांदे, बेसन पीठ, हळद, ओवा, मीठ, धनेपुड, खाण्याचा सोडा, मीठ
खसखस (Photo : YouTube) -
पातळ काप होणार असे कांदे उभे चिरायचे आणि कांद्याच्या पाकळ्या वेगवेगळ्या कराव्यात. (Photo : YouTube)
-
चिरलेल्या कांद्यावर मीठ आणि लिंबू टाकून हे मिश्रण दहा मिनिटे ठेवावे. (Photo : YouTube)
-
नंतर एका पातेल्यात बेसण घ्यावे आणि त्यात चिरलेल्या कांद्याचे मिश्रण, धनेपुड, मीठ, हळद, खसखस, ओवा टाकावा. (Photo : YouTube)
-
त्यात अगदी थोडे पाणी टाकावे. सर्व मिश्रण एकत्र करून दहा मिनिटे ठेवावे. (Photo : YouTube)
-
दहा मिनिटानंतर गरम तेलात भजी सोडण्यापूर्वी मिश्रणात खाण्याचा सोडा टाकावा. (Photo : YouTube)
-
भजी तेलात सोडताना पीठ गोळा करून सोडू नये तर कांद्याच्या पाकळ्या पीठासह सुटसुटीत करून तेलात सोडाव्यात ज्यामुळे भजी कुरकुरीत होणार. (Photo : YouTube)
Operation Sindoor Photos : पाकिस्तानमध्ये ९ ठिकाणी Air Strike केलेल्या ठिकाणाची स्थिती काय आहे? भारताने उद्ध्वस्त केलेल्या दहशतवादी तळांचे फोटो पाहा