• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. two rupees jugaad in two minutes clean bathroom kitchen taps spotless and shiny look with simple tips that will save money svs

फक्त २ रुपयात बाथरूम व किचनच्या नळांचा ‘हा’ मोठा प्रश्न सोडवा; घराचा लुक व पैसे वाचवतील ‘या’ टिप्स

Jugadu Tips: गंज लागणार नाही म्हणून स्टेन्सलेस स्टील, ऍल्युमिनियम अशा धातूंचा वापर हल्ली केला जातो. पण या नळांना पाण्यामुळे पडलेल्या डागापासून सुरक्षित कसं ठेवायचं हे कोणी सांगतं का?

August 14, 2023 20:30 IST
Follow Us
  • Two Rupees Jugaad In Two Minutes Clean Bathroom Kitchen Taps Spotless And Shiny Look With Simple Tips That will save money
    1/9

    Monsoon Jugaad: हल्ली घर Asthetic दिसावं यासाठी प्रत्येकजण अगदी बारकाईने वस्तूंची निवड- खरेदी करत असतो. पण काही वेळा वापरण्यात व स्वच्छ राखण्यात शिस्त नसेल तर घराचा लुक खर्च करूनही भकासच वाटतो.

  • 2/9

    तुम्हाला घरातील बाथरूम व नळांच्या बाबत एक मोठा त्रास तुम्हीही अनुभवलेला असेल. तो म्हणजे पाण्याचे चिवट डाग.

  • 3/9

    अनेकदा नळ विकत घेताना दुकानदार अगदी कौतुकाचे पूल बांधत असतो, गंज लागणार नाही म्हणून स्टेन्सलेस स्टील, ऍल्युमिनियम अशा धातूंचा वापर हल्ली केला जातो. पण या नळांना पाण्यामुळे पडलेल्या डागापासून सुरक्षित कसं ठेवायचं हे कोणी सांगतं का?

  • 4/9

    आज आपण अवघ्या दोन रुपयांमध्ये बाथरूम आणि किचन मधील नळांचे डाग कसे घालवायचे हे पाहणार आहोत

  • 5/9

    सगळ्यात पहिला जुगाड म्हणजे मेणबत्ती. तुम्ही फक्त दोन रुपयात मिळणारी मेणबत्ती नळाच्या पृष्ठभागावर चांगली घासून घ्या व नंतर हलक्या हाताने पुसून काढा.

  • 6/9

    मेणामुळे नळ आपोआप वॉटरप्रूफ होतात आणि पाणी साचून राहत नाही. एक सोपी टीप म्हणजे शक्यतो पांढरीच मेणबत्ती वापरा जेणेकरून निळे- पिवळे डाग पडणार नाहीत

  • 7/9

    दुसरा उपाय म्हणजे दोन थेंब खोबरेल तेल. नळावर खोबरेल तेल लावून पुसून काढल्यावर तेलाचा थर पाण्याला थारा देत नाही. याऐवजी आपण पॉलिशिंग क्रीमसुद्धा वापरू शकता पण स्वस्तात मस्त तेलाचा पर्याय उत्तम ठरेल.

  • 8/9

    तिसरा उपाय म्हणजे व्हॅसलिन. आपल्याकडे पेट्रोलियम जेलीचे डब्बे थंडी गेल्यावर असेच पडून असतात. दोन बोटांवर ही जेली घेऊन नळाला लावून घ्या व मग कपड्याने हलकेच पुसून काढा ज्यामुळे नळ पाण्यापासून सुरक्षित राहतील.

  • 9/9

    हा जुगाड तुम्ही करून पहा व त्याचा रिझल्ट कसा मिळतोय हे आमच्या सोशल मीडियावरील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.

  • (सर्व फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle News

Web Title: Two rupees jugaad in two minutes clean bathroom kitchen taps spotless and shiny look with simple tips that will save money svs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.