Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. how to store kadi patta or curry leaves for 5 6 months ndj

Curry Leaves : घरी कढीपत्त्याचे झाड नाही? टेन्शन घेऊ नका, असा साठवा ५-६ महिने कढीपत्ता

काही लोकांचा असा गैरसमज आहे की, कढीपत्ता जास्त दिवस टिकत नाही; पण कढीपत्ता तुम्ही अनेक महिने साठवून ठेवू शकता. तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे? पण हे खरं आहे. चला तर याविषयी सविस्तर जाणून घेऊ या ….

Updated: August 20, 2023 17:08 IST
Follow Us
  • कढीपत्ता हा आपण सहसा स्वयंपाक करताना अनेक पदार्थांमध्ये टाकतो. कढीपत्ता फक्त अन्नाची चवच वाढवत नाही, तर त्याशिवायही त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. (Photo : Pexels)
    1/9

    कढीपत्ता हा आपण सहसा स्वयंपाक करताना अनेक पदार्थांमध्ये टाकतो. कढीपत्ता फक्त अन्नाची चवच वाढवत नाही, तर त्याशिवायही त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. (Photo : Pexels)

  • 2/9

    अनेकांच्या घरी कढीपत्त्याचं झाड असतं; तर काही लोक गरजेनुसार तो विकत घेतात. काही लोकांचा असा गैरसमज आहे की, कढीपत्ता जास्त दिवस टिकत नाही; पण कढीपत्ता तुम्ही अनेक महिने साठवून ठेवू शकता. (Photo : Pexels)

  • 3/9

    तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे? पण हे खरं आहे. चला तर याविषयी सविस्तर जाणून घेऊ या … (Photo : Pexels)

  • 4/9

    जर तुम्हाला कढीपत्ता साठवून ठेवायचा असेल, तर भरपूर कढीपत्ता जमा करा. त्यानंतर हा संपूर्ण कढीपत्ता स्वच्छ पाण्यानं धुऊन, त्यातील खराब व चांगली पानं वेगवेगळी करा. (Photo : Pexels)

  • 5/9

    बाजूला केलेली कढीपत्त्याची चांगली पानं एक-दोन दिवस उन्हात ठेवा किंवा ती पानं पेपरमध्ये गुंडाळून पंख्यासमोर ठेवा. (Photo : Pexels)

  • 6/9

    कढीपत्त्याची ही पानं व्यवस्थित वाळल्यानंतर हवाबंद डबा किंवा बॅगमध्ये ठेवून फ्रिजमध्ये ठेवा. असं केल्यामुळे कढीपत्त्याला बुरशीपासून धोका नसतो. (Photo : Pexels)

  • 7/9

    याबरोबर कढीपत्ता खूप ताजा असतो. तुम्ही हा कढीपत्ता ५-६ महिने वापरू शकता. जर तुमच्याकडे फ्रिज नसेल, तर तुम्ही थंड ठिकाणी हा कढीपत्ता ठेवू शकता. (Photo : Pexels)

  • 8/9

    जर तुम्हाला ५-६ महिने कढीपत्ता साठवून ठेवायचा नसेल; पण १०-१२ दिवस ताजा असावा, असे वाटत असेल, तर तुम्ही कढीपत्ता पेपर टॉवेलमध्ये गुंडाळून तो फ्रिजमध्ये ठेवू शकता. (Photo : Pexels)

  • 9/9

    तीनचार दिवसांनंतर पेपर टॉवेल बदलणं आवश्यक आहे नाही तर कढीपत्ता लवकर खराब होऊ शकतो. (Photo : Pexels)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleसोपे घरगुती उपायEasy Home Remedies

Web Title: How to store kadi patta or curry leaves for 5 6 months ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.