Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. daughter in law and mother in law love care relationship tips for better relation ndj

सासू-सुनेने असा जपा नात्यातील सलोखा, कधीच होणार नाही भांडण!

अनेकदा लग्नानंतर सासू-सुनेमध्ये खटके उडतात आणि नात्यात दुरावा निर्माण होतो. बदलत्या काळानुसार हल्ली सासू-सुनेच्या नात्यामध्येही बदल दिसून येत आहे. त्या एकमेकींना समजून घेताना दिसत आहेत. आज आपण सासू-सुनेचे नाते कसे घट्ट करायचे आणि नात्यातील सलोखा कसा वाढवता येईल, हे पाहणार आहोत.

August 21, 2023 20:16 IST
Follow Us
  • सासू-सुनेचे नाते हा प्रत्येकाच्या कौटुंबिक जीवनाचा भाग असतो. भारतीय संस्कृतील सासू-सुनेचे नाते अत्यंत संवेदनशील मानले जाते. अनेकदा लग्नानंतर सासू-सुनेमध्ये खटके उडतात आणि नात्यात दुरावा निर्माण होतो. (Photo : Pexels)
    1/9

    सासू-सुनेचे नाते हा प्रत्येकाच्या कौटुंबिक जीवनाचा भाग असतो. भारतीय संस्कृतील सासू-सुनेचे नाते अत्यंत संवेदनशील मानले जाते. अनेकदा लग्नानंतर सासू-सुनेमध्ये खटके उडतात आणि नात्यात दुरावा निर्माण होतो. (Photo : Pexels)

  • 2/9

    बदलत्या काळानुसार हल्ली सासू-सुनेच्या नात्यामध्येही बदल दिसून येत आहे. त्या एकमेकींना समजून घेताना दिसत आहेत. आज आपण सासू-सुनेचे नाते कसे घट्ट करायचे आणि नात्यातील सलोखा कसा वाढवता येईल, हे पाहणार आहोत. (Photo : ‘Sundara Manamdhe Bharli’ tv serial)

  • 3/9

    कोणत्याही नात्यात एकमेकांचा आदर करणे खूप जास्त गरजेचे आहे. सासू-सुनेच्या नात्यातही तसेच आहे. सुनेने सासूचा आदर केला पाहिजे आणि आणि सासूने सुनेला मुलीप्रमाणे वागणूक दिली पाहिजे.. (Photo : (Aggabai Sasubai tv serial)

  • 4/9

    प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात. त्यामुळे मतभेद होणे साहजिकच आहे. जर सासू अन् सुनेला एकमेकांचे विचार पटले नाहीत, तर शांतपणे चर्चा केली पाहिजे. एकमेकांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेणे गरजेचे आहे. शांतताप्रिय स्वभाव सासू-सुनेच्या नात्याला आणखी घट्ट करतो. (Photo : Sundar majhe ghar )

  • 5/9

    सासू-सुनेच्या नात्यात एकमेकांची प्रशंसा करणे खूप जास्त गरजेचे आहे. सासूने सुनेची प्रशंसा केली, तर सुनेला तिच्याविषयी आपुलकी वाटू शकते आणि नात्यातील सलोखा वाढू शकतो. सुनेनेसुद्धा सासूविषयी चुकीचे बोलू नये. इतरांजवळ दोघींनीही एकमेकींची निंदा करू नये. (Photo : Saath Nibhaana Saathiya tv serial)

  • 6/9

    सून ही आई-वडिलांचे घर सोडून परक्या घरी येते. अशा वेळी सासूने तिला समजून घेतले पाहिजे आणि मुलीप्रमाणे वागणूक दिली पाहिजे. मुली आणि सुनेमध्ये कधीच भेद करू नका. दोघींना समान वागणूक द्या. (Photo : Pexels)

  • 7/9

    सुनेनेसुद्धा सासूवर आईसारखे प्रेम केले पाहिजे, तरच सासू-सुनेच्या नात्यात दूरावा निर्माण होणार नाही. (Photo : Pexels)

  • 8/9

    असे म्हणतात की, जिथे काळजी तिथे प्रेम असते. जर नात्यात एकमेकांविषयी काळजी असेल, तरच नाते आणखी दृढ होते. त्यामुळे सुनेने नेहमी सासूची आणि सासूनेही सुनेची मुलीप्रमाणे काळजी घ्यावी. (Photo : Pexels)

  • 9/9

    विशेष म्हणजे दोघींनी वेळप्रसंगी एकमेकींसाठी ठामपणे उभे राहावे. सासू व सून हे घरातील दोन भक्कम खांब आहेत. या दोन खांबांवर घराचा डोलारा उभा राहतो. त्यामुळे फक्त सासू-सुनेच्या नात्यापुरते नाही, तर एक स्त्री म्हणून दोघींनीही एकमेकीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे. (Photo : Pexels)

TOPICS
रिलेशनशिपRelationshipलग्नMarriageलाइफस्टाइलLifestyleसासूMother in Law

Web Title: Daughter in law and mother in law love care relationship tips for better relation ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.