• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. raksha bandhan 2023 these rakhis are considered inauspicious in astrology think carefully before tying rakhi on brother hand pvp

Raksha Bandhan 2023: ‘या’ राख्या ज्योतिषशास्त्रात मानल्या जातात अशुभ; भावाला राखी बांधण्याआधी नीट विचार करा

भावाला राखी बांधताना बहिणींनी काही गोष्टींची विशेष काळजी घ्यायला हवी. आज आपण जाणून घेऊया रक्षाबंधनाच्या वेळी भावांच्या हातावर कोणत्या प्रकारची राखी बांधू नये.

August 26, 2023 15:51 IST
Follow Us
  • raksha-bandhan-2023
    1/12

    पंचांगानुसार दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. एकमेकांशी भांडणाऱ्या पण एकमेकांवर प्रचंड जीव असणाऱ्या भावंडांना प्रेम व्यक्त करण्याची संधी हा दिवस देतो.

  • 2/12

    रक्षाबंधन या शब्दाचा अर्थ सुद्धा या नात्याइतकाच सहज व सोपा आहे. भावंडांनी एकमेकांची कठीण काळात रक्षा करायची आठवण करून देणारे एक बंधन यादिवशी राखीच्या रूपात हातावर बांधले जाते.

  • 3/12

    पारंपरिक रीतींनुसार भावाने बहिणीचे रक्षण करावे यासाठी बहीण भावाच्या हातावर राखी बांधते पण कालानुरूप आता अनेक संकल्पना बदलत आहेत, त्यामुळेच भावंडांनी एकमेकांच्या पाठीशी उभं राहण्याचा हा दिवस आहे असे म्हणता येईल.

  • 4/12

    हा सण भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे ते प्रतीक आहे. यंदा 30 आणि 31 ऑगस्टला संपूर्ण देशात रक्षाबंधन हा सण साजरा केला जाणार आहे.

  • 5/12

    ज्योतिषशास्त्रानुसार रक्षाबंधन शुभ मुहूर्तावर करणे लाभदायक असते. रक्षाबंधनाच्या निमित्ताने बाजारपेठेतही रंगीबेरंगी राख्या पाहायला मिळत आहेत.

  • 6/12

    पण भावाला राखी बांधताना बहिणींनी काही गोष्टींची विशेष काळजी घ्यायला हवी. आज आपण जाणून घेऊया रक्षाबंधनाच्या वेळी भावांच्या हातावर कोणत्या प्रकारची राखी बांधू नये.

  • 7/12

    लोकांना देवाचे चित्र असलेली राखी खरेदी करणे आवडते. त्यांचा असा विश्वास आहे की यामुळे देवाचे आशीर्वाद देखील मिळतात. वास्तविक, भावांच्या मनगटावर राख्या दीर्घकाळ असतात. अशा स्थितीत त्यांचे हातही घाण होतात किंवा अनेकदा राख्या तुटतात. या दोन्ही परिस्थितीत देवाचा अपमान होतो.

  • 8/12

    देवांचे फोटो असणाऱ्या राख्यांचा वापर जबाबदारीने करावा. रक्षाबंधननंतर अनेकदा या राख्यांवरील फोटो इथे इथे पडलेले आढळून येतात. या माध्यमातून कळत न कळत आपण देवीदेवतांचा अपमान करुन एखाद्याच्या भावना दुखावण्यास कारणीभूत ठरु शकतो. त्यामुळे देवांच्या फोटो असणाऱ्या राख्या वापरणार असाल त्यांची योग्यपद्धतीने काळजी घेण्याची जबाबदारीही स्वीकारावी.

  • 9/12

    या पवित्र सणात चुकूनही भावाच्या मनगटावर काळ्या रंगाची राखी बांधू नका. यासोबतच ज्या राखीमध्ये काळा धागा वापरण्यात आला आहे, ती भावाच्या मनगटावर बांधू नये. वास्तविक काळा रंग हा नकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे शुभ कार्यात या रंगाचा वापर निषिद्ध मानला गेला आहे.

  • 10/12

    विविध डिझाईनच्या राख्यांनी बाजारपेठ फुलून गेली आहे. अशा वेळी बहिणींनी भावासाठी राखी खरेदी करताना थोडी काळजी घ्यायला हवी. राखीवर कोणत्याही प्रकारचे अशुभ चिन्ह असू नये. सहसा, अशा प्रकारची राखी लहान मुलांसाठी घेतली जाते, जी त्यांना आकर्षित करते. परंतु अशा राख्या शुभ नसतात.

  • 11/12

    अनेक वेळा राखी बराच काळ ठेवली असेल तरी तुटते किंवा खराब होते. अशा वेळी चुकूनही तुटलेल्या राखी बांधू नका. अशा राख्या हिंदू धर्मात अशुभ मानल्या जातात. पूजेतही तुटलेल्या वस्तूंचा वापर करू नये.

  • 12/12

    येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. (Photos: Freepik/Pexels/Pixabay/Unsplash)

TOPICS
रक्षाबंधन २०२५Raksha Bandhan 2025

Web Title: Raksha bandhan 2023 these rakhis are considered inauspicious in astrology think carefully before tying rakhi on brother hand pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.