• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • अजित पवार
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. ask this questions to your future spouse if you are planning to get married snk

लग्न करण्याचा विचार करताय? भावी जोडीदाराला विचारा ‘हे’ प्रश्न

लग्नाच्या आधी तुमच्या मनातील सर्व प्रश्नांचे उत्तर मिळवणे योग्य असते. त्यामुळे तुमचे वैवाहिक आयुष्य नेहमी आनंदी होईल.

Updated: August 30, 2023 09:24 IST
Follow Us
  • marriage - unplash
    1/9

    लग्न कोणाबरोबरही झाले तरी मनामध्ये लाखो प्रश्न निर्माण होत असतात ज्याचा परिणाम तुमच्या वैवाहिक आयुष्यावर होत असतो.

  • 2/9

    अशा परिस्थितीमध्ये लग्नाच्या आधी तुमच्या मनातील सर्व प्रश्नांचे उत्तर मिळवणे योग्य असते. त्यामुळे तुमचे वैवाहिक आयुष्य नेहमी आनंदी होईल. चला जाणून घेऊ या कोणते आहेत हे प्रश्न.

  • 3/9

    प्रथांविषयी जाणून घ्या :
    प्रत्येकाच्या घरातील परंपरा आणि चालीरीती एकमेकांपेक्षा खूप वेगळ्या असतात. अशा परिस्थितीत, लग्नानंतर, तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या घराशी संबंधित प्रथा पाळण्यातही अडचण येऊ शकते. 

  • 4/9

    म्हणूनच लग्नापूर्वी जोडीदाराला त्याच्या घरातील सर्व चालीरीती आणि पद्धती समजून घेणे आवश्यक आहे. जेणेकरून तुम्ही त्यांच्यासाठी अगोदरच तयारी करू शकता आणि तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.

  • 5/9

    करिअरबाबत स्पष्टपणे बोला :
    बरेच लोक त्यांच्या करिअरबद्दल खूप गंभीर असतात. अशा परिस्थितीत, लग्नाचा निर्णय घेण्यापूर्वी, आपल्या भावी जोडीदाराशी याबद्दल बोला. या दरम्यान, त्यांच्या व्यवसायाशी संबंधित प्रश्न विचारा आणि आपल्या करिअरची उद्दिष्टे देखील त्याला सांगा.

  • 6/9

    त्यामुळे लग्नानंतरच्या जोडीदाराच्या कामामुळे कोणतीही अडचण येणार नाही आणि तुम्ही वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही आयुष्य चांगल्या पद्धतीने सांभाळू शकाल.

  • 7/9

    आर्थिक स्थितीबाबत मोकळेपणाने :
    लग्नापूर्वी तुम्ही तुमची आर्थिक स्थिती एकमेकांसह मोकळेपणाने चर्चा केली तर ते तुमच्यासाठी अधिक चांगले होऊ शकते. खरे तर लग्नानंतर अनेक वेळा जोडप्यांमध्ये पैशांवरून भांडणे होतात. म्हणूनच लग्नापूर्वी जोडीदाराशी स्वतःबद्दल आणि त्यांच्या आर्थिक परिस्थितीबद्दल बोलणे महत्त्वाचे आहे. जेणेकरून तुमचे वैवाहिक जीवन सदैव आनंदी राहावे.

  • 8/9

    कौटुंबिक नियोजनावर बोला:
    लग्नाआधी तुमच्या जोडीदाराशी कुटुंब नियोजनाबद्दलही बोला. तसेच प्रत्येक गोष्टीवर परस्पर सहमती झाल्यानंतरच नातं पुढे नेण्याचा विचार करा. वास्तविक अनेक जोडप्यांना लग्नानंतर कुटुंब नियोजन आवडते तर काहींना नाही. अशा परिस्थितीत, लग्नानंतर जर तुमचे विचार याविषयी जुळले नाहीत, तर तुम्ही स्वतःला तणाव येऊ शकतो.ॉ

  • 9/9

    काम आणि कुटुंबाबद्दलही बोला:
    लग्नानंतर अनेक वेळा नोकरी करणाऱ्या जोडप्यांमध्ये काम आणि कुटुंबाबाबत मतभेद होऊ लागतात. ही समस्या टाळण्यासाठी लग्नाआधी जोडीदाराशी बोलून सर्व काही क्लिअर करणे आवश्यक आहे. जेणेकरून लग्नानंतर नोकरी मिळाल्यावर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला कोणत्याही प्रकारची समस्या येत नाही आणि तुमचे वैवाहिक जीवन आनंदाने भरलेले असते.

TOPICS
रिलेशनशिपRelationshipलग्नMarriageलाइफस्टाइलLifestyle

Web Title: Ask this questions to your future spouse if you are planning to get married snk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.