• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. personality and nature of people according to birth timing personality test ndj

जन्मवेळेनुसार जाणून घ्या व्यक्तीचा स्वभाव अन् व्यक्तिमत्त्व

जन्माच्या वेळेनुसार व्यक्तीचा स्वभाव ओळखता येऊ शकतो. त्यामुळे तुमच्या बाळाचा जन्म कधी झाला, यावरून तुम्ही बाळाचे व्यक्तिमत्त्व जाणून घेऊ शकता.

September 2, 2023 17:45 IST
Follow Us
  • प्रत्येक आई-वडिलांना आपल्या बाळाचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व भविष्यात कसे असेल, याची नेहमी काळजी असते. पण, जन्माच्या वेळेनुसार व्यक्तीचा स्वभाव ओळखता येऊ शकतो. त्यामुळे तुमच्या बाळाचा जन्म कधी झाला, यावरून तुम्ही बाळाचे व्यक्तिमत्त्व जाणून घेऊ शकता. (Photo : Freepik)
    1/9

    प्रत्येक आई-वडिलांना आपल्या बाळाचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व भविष्यात कसे असेल, याची नेहमी काळजी असते. पण, जन्माच्या वेळेनुसार व्यक्तीचा स्वभाव ओळखता येऊ शकतो. त्यामुळे तुमच्या बाळाचा जन्म कधी झाला, यावरून तुम्ही बाळाचे व्यक्तिमत्त्व जाणून घेऊ शकता. (Photo : Freepik)

  • 2/9

    ज्या बाळांचा जन्म रात्री १२ ते २ च्या दरम्यान होतो, अशी मुलं भविष्यात खूप यशस्वी होतात. त्यांचे कुटुंबावर भरपूर प्रेम असते. त्यांच्याकडे अनोखी संवादशैली असते; ज्यामुळे ते कोणाचेही मन सहज जिंकू शकतात. (Photo : Freepik)

  • 3/9

    रात्री २ ते ४ दरम्यान जन्माला येणारी मुलं खूप आत्मविश्वासू असतात. त्यांना नेहमी एकटं राहायला आवडतं. ही मुलं कोणतंही काम खूप मेहनतीनं पूर्ण करतात; त्यामुळे त्यांना नेहमी यश मिळतं. (Photo : Freepik)

  • 4/9

    ज्या बाळांचा जन्म ४ ते ६ दरम्यान होतो, अशी मुलं स्वभावानं खूप दिलखुलास असतात. हे लोक खूप भावनिकही असतात. सकाळी ६ ते ८ दरम्यान जन्माला आलेल्या मुलांना वेळेचं खूप महत्त्व असतं. ते नेहमी कोणतंही काम वेळेच्या आधी पूर्ण करतात. त्यांना प्रत्येक कामात ‘परफेक्शन’ पाहिजे असतं. (Photo : Freepik)

  • 5/9

    सकाळी ८ ते १० दरम्यान जन्माला येणारी मुलं खूप लाजाळू असतात. त्यांना खूप कमी मित्र असतात; जे नेहमी त्यांच्या मदतीला धावून येतात. या मुलांना आयुष्यात अनेकदा एकटेपणा जाणवतो. सकाळी १० ते १२ दरम्यान जन्मलेली मुलं भविष्यात खूप महत्त्वाकांक्षी होतात. ही मुलं खूप मेहनती असतात. त्यांच्यामध्ये भरपूर आत्मविश्वास असतो. (Photo : Freepik)

  • 6/9

    दुपारी १२ ते २ दरम्यान ज्या बाळांचा जन्म होतो, ती मुलं भविष्यात खूप आज्ञाधारक असतात. ते आयुष्यात येणाऱ्या कोणत्याही लहान-मोठ्या संधीचं सोनं करतात. त्यांना नेहमी नवनवीन गोष्टी शिकायला आवडतात. (Photo : Freepik)

  • 7/9

    दुपारी २ ते ४ दरम्यान जन्मलेली बाळं खूप नशीबवान असतात. त्यांना आयुष्यात पैशाची कमतरता भासत नाही. हे लोक खूप सकारात्मक असतात.
    सायंकाळी ४ ते ६ दरम्यान ज्यांचा जन्म होतो, अशी मुलं खूप आशावादी असतात. त्यांच्या आजूबाजूला नेहमी विश्वासू लोक असतात. (Photo : Freepik)

  • 8/9

    रात्री ६ ते ८ दरम्यान जन्मलेली मुलं भविष्यात खूप मेहनती बनतात. त्यामुळे त्यांना नेहमी जीवनात यश मिळतं. रात्री ८ ते १० दरम्यान जन्मणारी बाळं खूप दयाळू असतात. ती नेहमी इतरांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात. (Photo : Freepik)

  • 9/9

    रात्री १० ते १२ दरम्यान जन्माला येणाऱ्या मुलांचं व्यक्तिमत्त्व खूप प्रभावशाली असतं. त्यांच्यामध्ये नेतृत्वगुण दिसून येतात. भविष्यात हे लोक चांगले वक्तेसुद्धा होऊ शकतात. (Photo : Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleव्यक्तिमत्वPersonality

Web Title: Personality and nature of people according to birth timing personality test ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.