• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. do you eat the food stored in plastic containers read what health expert said ndj

तुम्ही रोज प्लास्टिकच्या डब्यातले अन्न खाता का? आताच थांबवा…

प्लास्टिकच्या डब्यांमध्ये अन्न साठवून ठेवणे किंवा या डब्यांमधून अन्न खाणे चांगले आहे का? याविषयी लखनऊच्या रिजन्सी सुपरस्पेशॅलिटी हॉस्पिटलचे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. प्रवीण झा यांनी सविस्तर माहिती दिली.

September 5, 2023 18:51 IST
Follow Us
  • आपल्यापैकी अनेकांच्या घरी प्लास्टिक डबे वापरले जात असतील. महिलांना तर प्लास्टिक डब्यांविषयी विशेष प्रेम असते. तुमच्या घरातील महिलांना प्लास्टिक डबे जमा करण्याचा छंद असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. (Photo : Pexels)
    1/9

    आपल्यापैकी अनेकांच्या घरी प्लास्टिक डबे वापरले जात असतील. महिलांना तर प्लास्टिक डब्यांविषयी विशेष प्रेम असते. तुमच्या घरातील महिलांना प्लास्टिक डबे जमा करण्याचा छंद असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. (Photo : Pexels)

  • 2/9

    प्लास्टिकच्या डब्यांमध्ये अन्न साठवून ठेवणे किंवा या डब्यांमधून अन्न खाणे चांगले आहे का? याविषयी लखनऊच्या रिजन्सी सुपरस्पेशॅलिटी हॉस्पिटलचे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. प्रवीण झा यांनी सविस्तर माहिती दिली. (Photo : Pexels)

  • 3/9

    डॉ. झा सांगतात, “प्लास्टिकच्या डब्यांमध्ये अन्न साठवून ठेवणे चांगले आहे की वाईट, हे प्लास्टिकचा प्रकार आणि त्या अन्नाचा आपण कसा वापर करतो, यावर अवलंबून असते. काही प्लास्टिक अन्नाच्या संपर्कात आल्यानंतर धोकादायक केमिकल्स सोडतात. विशेषत: जेव्हा प्लास्टिकच्या डब्यात गरम अन्न असते” (Photo : Pexels)

  • 4/9

    प्लास्टिकच्या डब्यांमध्ये सर्वांत जास्त वापरला जाणारा एक प्रकार म्हणजे PETE. यालाच पॉलिथिलीन टेरेपथॅलेट (Polyethylene Terephthalate) म्हणून ओळखले जाते. हे प्लास्टिक तुम्ही फक्त एकदा वापरू शकतात; वारंवार नाही. डॉ. झा सांगतात प्लास्टिक वापरण्यापूर्वी ते अन्नासाठी सुरक्षित आहे का, हे तपासणे गरजेचे आहे. (Photo : Pexels)

  • 5/9

    प्लास्टिकच्या डब्यांमध्ये अन्न साठवणे चुकीचे नाही. पण, कोणत्या प्रकारच्या प्लास्टिक कंटेनरमध्ये अन्न साठवू नये, हे समजून घेणे गरजेचे आहे. जे पदार्थ गरम, तेलकट व आम्लयुक्त असतात, असे अन्न प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये साठवल्यामुळे प्लास्टिक केमिकल्स सोडतात; जे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असते. (Photo : Pexels)

  • 6/9

    डॉ. झा सांगतात, “जुने किंवा खराब झालेले प्लास्टिक कंटेनर वापरू नयेत. असे प्लास्टिक जास्त प्रमाणात केमिकल्स सोडू शकतात.” (Photo : Pexels)

  • 7/9

    प्लास्टिकच्या डब्यांमध्ये अन्न ठेवण्यासाठी ‘फूड ग्रेड’ किंवा ‘बीपीए-फ्री’ लेबल केलेले प्लास्टिक कंटेनर निवडा. BPA (Bisphenol A) हे केमिकल आहे; ज्यामुळे आरोग्य धोक्यात येऊ शकते. (Photo : Pexels)

  • 8/9

    प्लास्टिकचा कंटेनर कधीही मायक्रोवेव्हमध्ये ठेवू नका. कारण- उष्णतेमुळे प्लास्टिकमधून केमिकल बाहेर पडण्यास प्रोत्साहन मिळते. खराब झालेले प्लास्टिक कंटेनर वापरणे टाळा. (Photo : Pexels)

  • 9/9

    वेगवेगळ्या प्लास्टिक कंटेनरसाठी वेगवेगळी मार्गदर्शक तत्त्वे असतात आणि ही मार्गदर्शक तत्त्वे प्लास्टिक सुरक्षित वापरण्यासाठी मदत करतात. जास्त कालावधीसाठी प्लास्टिक कंटेनरचा वापर टाळा. एकदोन दिवसापर्यंत प्लास्टिक कंटेनरमध्ये अन्न साठवून ठेवू नका. (Photo : Pexels)

TOPICS
फूडFoodलाइफस्टाइलLifestyle

Web Title: Do you eat the food stored in plastic containers read what health expert said ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.