-
ऑफीस किंवा कुठेही बाहेर फिरायला जायचं असेल तर आपण आवडीने शूज घालतो. ऑफीस किंवा कुठेही बाहेर फिरायला जायचं असेल तर आपण आवडीने शूज घालतो. (Photo : Freepik)
-
अनेकांना पांढरे शूज घालायला आवडतात पण लवकर खराब होणार, या भीतीने अनेकजण पांढरे शूज घेणे, टाळतात. (Photo : Freepik)
-
सध्या पांढऱ्या शूजची मागणी खूप वाढली आहे. फॅशन आणि ट्रेंडनुसार तुम्हालाही पांढरे शूज घ्यायचे असेल तर बिनधास्त घ्या आणि शूज खराब होण्याची चिंता करू नका. (Photo : Freepik)
-
आज आम्ही तुम्हाला डाग पडलेले किंवा मळलेले पांढरे शूज स्वच्छ करायचे? या विषयी सांगणार आहोत. (Photo : Freepik)
-
काही सोप्या घरगुती टिप्स फॉलो करून तुम्ही पांढरे शूज चमकदार करू शकता. (Photo : Freepik)
-
बेकिंग सोडा आणि व्हिनेगरच्या मदतीने तुम्ही शुज स्वच्छ करू शकता. (Photo : Freepik)
-
बेकिंग सोडामध्ये व्हिनेगरमध्ये मिसळा. यात थोडे गरम पाणी टाका. हे मिश्रम शुजवर टाका आणि जुन्या टूथब्रशने शूज घासा यामुळे शूजवरील डाग निघून जातील. (Photo : Freepik)
-
टूथपेस्टच्या मदतीने सुद्धा तुम्ही खराब शूज स्वच्छ करू शकता. (Photo : Pexels)
-
बेकिंग सोडा आणि डिटर्जंट पावडर एकत्र करा त्यात थोडे पाणी टाका. ही पेस्ट शूजवर लावा आणि शूज ब्रशने चांगला घासा. मळलेला शूज नव्यासारखा चमकेल. (Photo : Pexels)
Desi Jugaad : पांढरे शूज वारंवार मळतात? ‘या’ ट्रिक्सनी करा झटक्यात स्वच्छ, नव्यासारखे चमकतील
काही सोप्या घरगुती टिप्स फॉलो करून तुम्ही पांढरे शूज चमकदार करू शकता.
Web Title: How to clean white shoes tricks jugaad to shine like new ndj