• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. every couple or husband and wife should do these five things in the morning to make strong relation ndj

प्रत्येक जोडप्याने सकाळी उठल्यानंतर करावीत ‘ही’ पाच कामे

दिवसाची सुरुवात उत्तम झाली, तर दिवसही उत्तम जातो. जर प्रत्येक विवाहित जोडप्याने सकाळी उठल्यानंतर ही पाच कामे केली, तर नवरा-बायकोचे नाते घट्ट होण्यास मदत होऊ शकते.

September 15, 2023 19:11 IST
Follow Us
  • relationship tips
    1/9

    लग्नानंतर नवरा-बायको या नव्या नात्याची सुरुवात होते. या नात्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा, आपुलकी व समजूतदारपणा असेल तरच हे नाते टिकते. (Photo : Freepik)

  • 2/9

    नवरा आणि बायको दोघांनीही हे नाते जपण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. नवरा-बायकोचे नाते घट्ट कसे करावे, यासाठी प्रत्येक जोडप्याने काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. आज आपण त्या विषयीच जाणून घेणार आहोत. (Photo : Freepik)

  • 3/9

    दिवसाची सुरुवात उत्तम झाली, तर दिवसही उत्तम जातो. जर प्रत्येक विवाहित जोडप्याने सकाळी उठल्यानंतर ही पाच कामे केली, तर नवरा-बायकोचे नाते घट्ट होण्यास मदत होऊ शकते. (Photo : Freepik)

  • 4/9

    सकाळी जर तुम्ही तुमच्या पार्टनरला ‘गुड मॉर्निंग’ म्हणत असाल, तर दिवसाची सुरुवात उत्तम होऊ शकते. तुमचा आणि तुमच्या पार्टनरचा दिवस खूप चांगला जाऊ शकतो. नाते घट्ट करण्याची ही एक सोपी ट्रिक आहे. (Photo : Freepik)

  • 5/9

    जर तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुमच्या पार्टनरबरोबर चहा आणि ब्रेकफास्ट घेत असाल, तर ही एक चांगली सवय आहे; जी तुमचे नाते अधिक घट्ट बनवू शकते. पण, लक्षात ठेवा चहा किंवा ब्रेकफास्ट करताना सकारात्मक गोष्टींवर चर्चा करा. (Photo : Freepik)

  • 6/9

    आपला पार्टनर आपल्यासाठी अनेक गोष्टी करतो; पण आपण अनेकदा त्याला गृहीत धरतो आणि कधीच आभार व्यक्त करीत नाही. पण, नाते घट्ट करायचे असेल, तर पार्टनरला दररोज धन्यवाद म्हणा. त्यामुळे तुमच्या नात्यातील प्रेम आणि सलोखा वाढू शकतो. (Photo : Freepik)

  • 7/9

    पार्टनरबरोबर सकाळी कमीत कमी दहा मिनिटे तरी निवांत बोला. प्रेम व्यक्त करा, मजा मस्ती करा किंवा दिवसाभराच्या प्लॅनिंगविषयी चर्चा करा पण सकाळी पार्टनरला थोडा वेळ देणे गरजेचे आहे. (Photo : Freepik)

  • 8/9

    सकाळी सकाळी पार्टनरसमोर प्रेम व्यक्त करा. तुम्ही पार्टनरला सकाळी आवडते फूल देऊन ‘गुड मॉर्निंग’ अशा शुभेच्छा देऊ शकता किंवा घरातून बाहेर पडण्यापूर्वी मिठी मारू शकता. (Photo : Freepik)

  • 9/9

    या कारणामुळे तुमच्या शरीरात हॅप्पी हार्मोन्स निर्माण होऊ शकतात आणि तुमचा दिवसही उत्तम जाऊ शकतो. (Photo : Freepik)

TOPICS
रिलेशनशिपRelationship

Web Title: Every couple or husband and wife should do these five things in the morning to make strong relation ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.