Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. what is the right time to check weight morning noon evening night weight loss news in marathi healthy lifestyle ndj

वजन तपासण्याची योग्य वेळ कोणती? सकाळी, दुपारी, संध्याकाळी की रात्री? जाणून घ्या…

वजन कमी करण्यासाठी विविध प्रकारचे उपाय करताना काही लोकांना वारंवार आपले वजन सध्या किती आहे, हे तपासण्याची खूप उत्सुकता असते. पण, अशा लोकांनी हे समजून घेणे गरजेचे आहे की, वजन तपासण्याचीसुद्धा एक ठरावीक वेळ असते. तुम्हाला आश्चर्य वाटेल; पण हे खरे आहे.

October 3, 2023 18:50 IST
Follow Us
  • weight gain
    1/9

    वजनवाढ ही खूप मोठी समस्या आहे. चुकीची जीवनशैली अनेकदा वजन वाढण्यास कारणीभूत ठरते. वजन कमी करण्यासाठी अनेक जण वाट्टेल ते प्रयत्न करतात; पण अनेकदा खूप प्रयत्न करूनही वजन कमी होत नाही. (Photo : Freepik)

  • 2/9

    वजन कमी करण्यासाठी विविध प्रकारचे उपाय करताना काही लोकांना वारंवार आपले वजन सध्या किती आहे, हे तपासण्याची खूप उत्सुकता असते.
    पण, अशा लोकांनी हे समजून घेणे गरजेचे आहे की, वजन तपासण्याचीसुद्धा एक ठरावीक वेळ असते. तुम्हाला आश्चर्य वाटेल; पण हे खरे आहे. (Photo : Freepik)

  • 3/9

    ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या ‘Know Your Body’ या मालिकेत वजन तपासण्याचा योग्य मार्ग आणि वेळ याविषयी तज्ज्ञांनी माहिती दिली आहे. (Photo : Freepik)

  • 4/9

    सकाळी उपाशीपोटी वजन तपासणे केव्हाही चांगले आहे. ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना फूड थेरपिस्ट डॉ. रिया बॅनर्जी सांगतात, “सकाळी शौचाला जाऊन आल्यानंतर पाणी, औषध, चहा, असे काहीही न घेता, जर तुम्ही वजन तपासत असाल, तर ते तुमचे योग्य वजन असते.” (Photo : Freepik)

  • 5/9

    पुढे डॉ. रिया सांगतात, “सकाळचे वजन किती असणार हे प्रत्येक व्यक्ती-व्यक्तीवर अवलंबून असते, हे समजून घेणेही गरजेचे आहे. जे लोक दररोज ४५ मिनिटे ते एक तास व्यायाम करतात, त्यांचे वजन संध्याकाळी थोडे जास्त असते. कारण- त्यांच्या वजनामध्ये जेवण आणि पाण्याचा समावेश असतो (Photo : Freepik)

  • 6/9

    जे क्रीडापटू शारीरिकदृषट्या नेहमी सक्रिय असतात, त्यांचे वजन संध्याकाळी कमी असते. त्यामुळे खरे वजन नेमके किती, हे फक्त सकाळी जाणून घेता येऊ शकते. (Photo : Freepik)

  • 7/9

    “वजन तपासण्याची योग्य वेळ ही सकाळी असली तरी नियमित वजन तपासण्याची आवश्यकता नाही”, असे डॉ. रिया सांगतात. (Photo : Freepik)

  • 8/9

    डॉ. रिया पुढे सांगतात, “महिन्यातून एकदा उपाशीपोटी वजन तपासणे, सर्वांत चांगले आहे; पण तुम्ही वजन तपासण्यासाठी नियमित उत्सुक असाल, तर आठवड्यातून एकदा तुम्ही वजन तपासू शकता. (Photo : Freepik)

  • 9/9

    त्या पुढे सांगतात, “हे लक्षात ठेवा की, आदल्या दिवशी आपण किती खाल्ले आहे, दिवसभर किती पाणी प्यायलो, नवीन औषधी किंवा दिवसभरातील शारीरिक हालचाली यांनुसार वजन कमी-जास्त दिसू शकते.” (Photo : Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle News

Web Title: What is the right time to check weight morning noon evening night weight loss news in marathi healthy lifestyle ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.