-

आरसा ही अशी वस्तू आहे की, जी प्रत्येकाच्या घरी असते. क्वचितच कोणी असेल की, ज्याच्या घरी आरसा नाही. (Photo : Freepik)
-
घरातून बाहेर पडताना प्रत्येक व्यक्ती एकदा तरी आरशासमोर उभी राहते आणि स्वत:ला पाहते. आरशासमोर स्वत:चे रूप न्याहाळणे अनेकांना आवडते. (Photo : Freepik)
-
आपण कसे दिसतोय, याची उत्सुकता प्रत्येकाला असते. त्यामुळे आरशाचा वापर प्रत्येक जण करतो. (Photo : Freepik)
-
अनेकदा घर स्वच्छ करताना आरसा स्वच्छ करायला मात्र आपण विसरून जातो. (Photo : Freepik)
-
बरेच दिवस आरसा स्वच्छ न केल्यामुळे आरशावर डाग पडतात. आरसा स्वच्छ करताना अनेक जण काही चुका करतात आणि त्यामुळे आरशावर आणखी डाग पडतात. (Photo : Freepik)
-
धूसर आरसा कसा स्वच्छ कसा करायचा, हा प्रश्न तुम्हाला पडतो का? टेन्शन घेऊ नका. आज आम्ही तुम्हाला अगदी सोपा उपाय सांगणार आहोत. (Photo : Freepik)
-
तुम्ही बटाट्याच्या मदतीने आरसा स्वच्छ करू शकता. तुम्हाला वाटेल हे कसे शक्य आहे? पण, हे खरेय. (Photo : Freepik)
-
सहसा बटाटा आपण खातो; पण बटाट्याचा वापर आरसा स्वच्छ करण्यासाठीसुद्धा केला जातो. (Photo : Freepik)
-
एक बटाटा घ्या. या बटाट्याला मधोमध कापून घ्या. बटाट्याचा पांढरा भाग खराब आरशावर घासा. नीट घासल्यानंतर आरसा पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या. (Photo : Freepik)
Desi Jugaad : फक्त एका बटाट्याने स्वच्छ करा खराब आरसा; नव्यासारखा चमकेल!
आरसा स्वच्छ करताना अनेक जण काही चुका करतात आणि त्यामुळे आरशावर आणखी डाग पडतात. धूसर आरसा कसा स्वच्छ कसा करायचा, हा प्रश्न तुम्हाला पडतो का? टेन्शन घेऊ नका. आज आम्ही तुम्हाला अगदी सोपा उपाय सांगणार आहोत.
Web Title: Desi jugaad to clean mirror with the help of single potato mirror cleaning secret ndj