-
प्रसूतीनंतर महिलांचे वजन वाढणे ही खूप सामान्य समस्या आहे. प्रसूती झाल्यानंतर पोट आणि कंबरेजवळची चरबी वाढते. (Photo : Freepik)
-
वजन कमी करण्यासाठी महिला वाट्टेल ते प्रयत्न करतात, पण तुम्हाला माहिती आहे का, प्रसूतीनंतर वजन वाढणे चांगले आहे की वाईट? (Photo : Freepik)
-
याविषयी डॉ. दिप्ती जामी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर करत सविस्तर माहिती दिली आहे. (Photo : Freepik)
-
डॉ. दिप्ती जामी सांगतात, “प्रसूतीनंतर वजन वाढणे खूप सामान्य गोष्ट आहे.” (Photo : Freepik)
-
“नऊ महिन्यांच्या गर्भधारणेदरम्यान महिलांच्या शरीरामध्ये अनेक बदल घडून येतात आणि वजन वाढते; पण प्रसूतीनंतर शरीर पुन्हा पूर्वीसारखे होऊ शकते.” (Photo : Freepik)
-
त्या पुढे सांगतात, “हार्मोनल बदल, स्तनपानादरम्यान वाढलेल्या कॅलरीज, कमी झोप इत्यादी काही गोष्टींमुळे प्रसूतीनंतर वजन वाढते. (Photo : Freepik)
-
“अति प्रमाणात वजन वाढणे महिलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी चांगले नाही. (Photo : Freepik)
-
“त्यामुळे प्रसूतीनंतर वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करणे खूप गरजेचे आहे.” (Photo : Freepik)
-
अनेक महिला प्रसूतीनंतर वजन वाढले की टेन्शन घेतात. त्यांच्यासाठी डॉ. दिप्ती जामी यांनी दिलेली ही माहिती फायदेशीर ठरू शकते. (Photo : Freepik)
प्रसूतीनंतर वजन वाढणे चांगले की वाईट? जाणून घ्या…
तुम्हाला माहिती आहे का, प्रसूतीनंतर वजन वाढणे चांगले आहे की वाईट? याविषयी डॉ. दिप्ती जामी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर करत सविस्तर माहिती दिली आहे.
Web Title: Is it normal to gain weight after delivery know more about woman post pregnancy woman health news ndj