• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. pav bhaji recipe make tasty pav bhaji like hotel street food lovers ndj

Pav Bhaji : घरीच बनवा हॉटेलसारखी स्वादिष्ट पावभाजी, ही सोपी रेसिपी जाणून घ्या

आज आम्ही तुम्हाला पावभाजी घरी कशी बनवायची, हे सांगणार आहोत. पावभाजीची ही रेसिपी खूप सोपी आहे. या रेसिपीच्या मदतीने तुम्ही हॉटेलसारख्या स्वादिष्ट पावभाजीचा आनंद घेऊ शकता.

November 23, 2023 13:49 IST
Follow Us
  • Pav Bhaji recipe
    1/9

    पावभाजी हा असा पदार्थ आहे की जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना आवडतो.अनेक जण वीकेंड आला की घराबाहेर पडतात आणि बाहेरची पावभाजी आवडीने खातात. (Photo : Social media/ Instagram)

  • 2/9

    आज आम्ही तुम्हाला पावभाजी घरी कशी बनवायची, हे सांगणार आहोत. पावभाजीची ही रेसिपी खूप सोपी आहे. (Photo : Social media/ Instagram)

  • 3/9

    या रेसिपीच्या मदतीने तुम्ही हॉटेलसारख्या स्वादिष्ट पावभाजीचा आनंद घेऊ शकता. (Photo : Social media/ Instagram)

  • 4/9

    साहित्य – कांदा, टोमॅटो, फ्लॉवर, बटाटा, वाटाणे, शिमला मिरची, आलं लसणाची पेस्ट, लाल मिरची पावडर, पावभाजी मसाला, कोथिंबीर, तेल, तूप आणि मीठ (Photo : Social media/ Instagram)

  • 5/9

    बारीक चिरलेली शिमला मिरची, टोमॅटो, फ्लॉवर आणि बटाटा घ्या. त्यात वाटाणे टाका.कुकरमध्ये थोडं तेल टाका. तेल गरम झाल्यावर त्यात या सर्व भाज्या टाका. या भाज्या तेलामध्ये परतून घ्याव्यात. (Photo : Social media/ Instagram)

  • 6/9

    त्यानंतर त्यात पाणी टाका आणि कुकरमध्ये सर्व भाज्या मध्यम आचेवर तीन शिट्ट्या होईपर्यंत चांगले शिजवून घ्या.शिजलेल्या भाज्या रईने एकजीव करुन बारीक पेस्ट करुन घ्या. (Photo : Social media/ Instagram)

  • 7/9

    एका कढईत तेल घ्या. तेल गरम झाल्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा टाकावा. कांदा चांगला परतून घ्यावा.त्यात आलं लसणाची पेस्ट टाका. त्यात लाल मिरची पावडर टाका. त्यानंतर त्यात पावभाजी मसाला टाका.हे सर्व मसाले चांगले परतून घ्या आणि त्यात थोडे पाणी घाला. (Photo : Social media/ Instagram)

  • 8/9

    मसाल्याला तेल सुटल्यानंतर त्यात पेस्ट केलेल्या भाज्या टाका आणि एकजीव करा. भाजी जास्त घट्ट होऊ नये म्हणून प्रमाणानुसार पाणी घाला.त्यात चवीनुसार मीठ आणि तूप घाला. (Photo : Social media/ Instagram)

  • 9/9

    पाच मिनिटे पावभाजी शिजू द्या. गरमा गरम पावभाजीवर कोथिंबीर घाला आणि गरमा गरम पावबरोबर ही भाजी सर्व्ह करा. (Photo : Social media/ Instagram)

TOPICS
इंडियन फूडIndian FoodफूडFoodरेसिपीRecipeलाइफस्टाइलLifestyleहेल्दी फूडHealthy Food

Web Title: Pav bhaji recipe make tasty pav bhaji like hotel street food lovers ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.