• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. carrots recipes winter diet health tips marathi sc ieghd import vvk

Winter special recipe: थंडीत बनवा गाजरापासून ‘हे’ ७ पौष्टिक पदार्थ

हिवाळ्यामध्ये गाजरं मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. गाजराची कोशिंबीर आणि गाजराचा हलवा सगळेच करतात. परंतु, गाजराचे ‘हे’ पदार्थ नक्की ट्राय करून बघा. पौष्टिक, कमी वेळेत होणारे असे हे पदार्थ आहेत

Updated: December 7, 2023 11:20 IST
Follow Us
  • carrots recipes winter diet health tips gujarati news
    1/11

    हिवाळ्यामध्ये गाजरं मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. साधारणतः गाजर हलवा किंवा कोशिंबीर यांचा आहारामध्ये समावेश केला जातो. परंतु, गाजराच्या या इतर पाककृती नक्की ट्राय करून बघा

  • 2/11

    गाजराची चटणी: नारळाची चटणी आणि सांभर कुरकुरीत डोसा आणि इडलीसोबत स्वादिष्ट लागतात, हे आपल्याला माहीत आहे. दक्षिण भारतामध्ये गाजराची चटणीही दिली जाते. गाजराची चटणी ही पौष्टिक आणि पोळी, इडली, डोसा अशा पदार्थांसह खाण्यास चांगली लागते (स्रोत: हेब्बर्स किचन)

  • 3/11

    गाजर पराठा : गाजर कोशिंबीर खाऊन कंटाळा आला असेल, तर गाजर पराठा नक्की ट्राय करा आणि बटरबरोबर सर्व्ह करा.

  • 4/11

    गाजर डोसा : गाजर डोसा हा नाश्त्यासाठी उत्तम पर्याय आहे. हा बनवण्यास वेळही लागत नाही. तसेच पौष्टिक नाश्ताही होतो

  • 5/11

    गाजर बर्गर : जंक फूड खाण्यासाठी निमित्त हवे आहे? गाजर बर्गर आवडत्या-पण-अनारोग्य बर्गरसाठी एक आरोग्यदायी पर्याय आहे.

  • 6/11

    गाजर सूप : थंडीच्या काळात शरीर निरोगी ठेवण्यासाठी गाजराचे सूप उपयुक्त आहे.

  • 7/11

    गाजर पाई : जर तुम्हाला गोड काहीतरी हवे असेल तर गाजर पाई करून पहा.

  • 8/11

    गाजराचा हलवा : गाजराचा हलवा सर्वांनाच आवडतो. हिवाळा आला की ही खास रेसिपी बहुतेक घरांमध्ये केली जाते. तुम्ही गाजराचा हलवा मायक्रोवेव्ह किंवा एअर फ्रायरमध्येही बनवू शकता.

  • 9/11

    गाजर राईस : लेमन राईस, बिर्याणी, पुलाव, सांबार भात यापैकी निवड करण्याचा विचार केला तर खाद्यपदार्थांच्या आवडीची यादी मोठी असते. तर तुमच्या लिस्टमध्ये गाजर राईस सोपी आणि पौष्टिक रेसिपी आहे.

  • 10/11

    गाजर सांबार : थोडे तेल घालून बनवलेला हा पदार्थ विशेषतः गुजरातमध्ये प्रसिद्ध आहे. 5 मिनिटांत किंवा त्यापेक्षा कमी वेळात स्वादिष्ट गाजर सांबार तयार होऊ शकतो.

  • 11/11

    गाजराचे लोणचे: आंबा आणि लिंबाच्या प्रकारांइतके लोकप्रिय नसले तरी गाजराचे लोणचे हे अनेकांचे आवडते आहे. शिवाय, ते आपल्या आवडीनुसार मसालेदार किंवा तिखट बनवू शकता.

TOPICS
रेसिपीRecipe

Web Title: Carrots recipes winter diet health tips marathi sc ieghd import vvk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.