• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. butterfly beach to paradise beach these are most beautiful beaches of india jshd import dha

भारतातील सर्वात सुंदर किनारे… इथून समुद्राच्या लाटांसह नयनरम्य अशा दृश्यांचा आनंद घेऊ शकता.

भारत आपल्या सौंदर्य आणि विविधतेसाठी ओळखला जातो. प्राचीन मंदिरांपासून ते खाण्यापिण्यापर्यंतच्या बऱ्याच गोष्टी खूप प्रसिद्ध आहेत. पण आज आम्ही तुम्हाला भारतातील सध्याच्या सुंदर समुद्रकिनाऱ्यांबद्दल सांगणार आहोत, जे त्यांच्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध आहेत.

December 8, 2023 20:54 IST
Follow Us
  • most beautiful beaches of india
    1/8

    भारतात अनेक सुंदर समुद्रकिनारे आहेत जे परदेशी लोकांमध्येही खूप प्रसिद्ध आहेत. या किनार्‍यांची स्वतःची वेगळी वैशिष्ट्ये आहेत, ज्यामुळे ते पर्यटकांसाठी आकर्षक बनतात. भारतातील या सुंदर समुद्रकिनाऱ्यांबद्दल जाणून घेऊया.
    [फोटो स्त्रोत : @VertigoWarrior/twitter]

  • 2/8

    बटरफ्लाय बीच, गोवा
    बटरफ्लाय बीच गोव्यातील कैनकोना भागात पालोलेमच्या दक्षिणेला आहे. या बीचच्या आजूबाजूची झाडे फुलपाखरांना आकर्षित करतात म्हणून या बीचला बटरफ्लाय बीच असे नाव देण्यात आले आहे, असे म्हंटले जाते.
    [फोटो स्त्रोत : @VertigoWarrior/twitter]

  • 3/8

    मंदारमणी बीच, पश्चिम बंगाल
    मंदारमणी बीच पश्चिम बंगालच्या मेदिनीपूर जिल्ह्यात आहे. असे मानले जाते की हा समुद्रकिनारा भारतातील सर्वात लांब ड्रायव्हेबल बीच आहे.
    [फोटो स्त्रोत : @VertigoWarrior/twitter]

  • 4/8

    यारदा बीच, आंध्र प्रदेश
    याराडा बीच बंगालच्या उपसागराच्या पश्चिम किनार्‍यावर विशाखापट्टणमपासून १५ किलोमीटर अंतरावर याराडा नावाच्या गावात आहे. याराडा बीच हा तीनही बाजूंनी टेकड्यांनी वेढलेला असून, चौथ्या बाजूला बंगालचा उपसागर आहे.
    [फोटो स्त्रोत : @VertigoWarrior/twitter]

  • 5/8

    वर्कला बीच, केरळ
    वर्कला बीच दक्षिण केरळमधील त्रिवेंद्रमच्या उत्तर सीमेवर स्थित आहे. येथील स्थानिक लोक मानतात की या समुद्रकिनाऱ्याचे पाणी पवित्र आहे, त्यात स्नान केल्याने शरीरातील रोगांपासून मुक्ती मिळते आणि सर्व पाप धुऊन जातात. म्हणूनच या समुद्रकिनाऱ्याला ‘पापनासम बीच’ असेही म्हणतात.
    [फोटो स्त्रोत : @VertigoWarrior/twitter]

  • 6/8

    थरंगंबडी बीच, तामिळनाडू
    थरंगंबडी बीच हे तामिळनाडूच्या नागापट्टिनम येथे आहे. या समुद्रकिनाऱ्याजवळ एक किल्ला बांधला आहे जिथून डॅनिश साम्राज्याने आपली सत्ता सुरू केली. या बीचच्या आसपास तुम्ही डॅनिश साम्राज्याची झलक अनुभवू शकता.
    [फोटो स्त्रोत : @VertigoWarrior/twitter]

  • 7/8

    चोरवाड बीच, गुजरात
    चोरवड समुद्रकिनारा एकेकाळी जुनागडच्या नवाबाच्या घराचे ठिकाण होते. त्यांचा शाही राजवाडा आजही या बीचजवळ उभा असून त्याचे आता लक्झरी बीच रिसॉर्टमध्ये रूपांतर झाले आहे. याशिवाय,हा समुद्र त्याच्या’सिंकिंग वाळू’साठी सुद्धा ओळखला जातो. हे थोडे धोकादायक वाटत असले तरी ऍडव्हेंचर्स आहे.
    [फोटो स्त्रोत : @VertigoWarrior/twitter]

  • 8/8

    पॅराडाईज बीच, पाँडिचेरी
    पॅराडाईज बीच हे पाँडिचेरीमधील सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. हा बीच डॉल्फिन पाहण्यासाठी प्रसिद्ध आहे. डॉल्फिनचे कळप पाहण्यासाठी पर्यटक अनेकदा सकाळच्या वेळी समुद्र किनाऱ्यावर येतात.
    [फोटो स्त्रोत : @VertigoWarrior/twitter]

TOPICS
आंध्रप्रदेशAndhra PradeshकेरळKeralaगुजरातGujaratगोवाGoaट्रॅव्हल डेस्टिनेशनTravel Destinationप्रवासTravelलाइफस्टाइलLifestyle

Web Title: Butterfly beach to paradise beach these are most beautiful beaches of india jshd import dha

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.