• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. while peeing do not hover or squat on western commodes doctor tells how it affects body specially women check washroom rules svs

लघवी करताना कमोडवर अर्धवट कधीच बसू नका! Squats मुळे होणाऱ्या परिणामांविषयी डॉक्टर काय सांगतात, पाहा

Peeing In Public Washroom: आपण उठाबशा जशा काढतो तशा व्यायामाच्या पोजिशनमध्ये कमोडला स्पर्श होऊ न देता बसण्याबाबत आपणही ऐकून असाल. पण तुम्हाला माहित आहे का, या स्क्वॉट पोजिशनमध्ये लघवी करण्याचा परिणाम अत्यंत गंभीर होऊ शकतो.

December 8, 2023 20:49 IST
Follow Us
  • While Peeing Do Not Hover or Squat On Western Commodes Doctor Tells How It Affects Body Specially Women Check Washroom Rules
    1/9

    Peeing At Public Toilet: अलीकडे मॉल, ऑफिस, कॉलेज- शाळांमध्ये सार्वजनिक शौचालयात कमोड वापरले जातात. काही वेळा या कमोड्सची अवस्था अगदीच भीषण असते

  • 2/9

    भारतीय शौचालयाच्या विरुद्ध या पाश्चिमात्य टॉयलेट्समध्ये त्वचेचा विषाणूंशी जवळून संबंध येणार असल्याने अनेक महिला सार्वजनिक शौचालयात कमोडवर बसण्याच्या ऐवजी स्क्वॉट पोजिशनमध्ये बसतात.

  • 3/9

    म्हणजे काय तर, अर्धवट आपण उठाबशा जशा काढतो तशा व्यायामाच्या पोजिशनमध्ये कमोडला स्पर्श होऊ न देता बसणे. पण तुम्हाला माहित आहे का या स्क्वॉट पोजिशनमध्ये लघवी करण्याचा परिणाम अत्यंत गंभीर होऊ शकतो.

  • 4/9

    अलीकडेच, डॉ तानिया क्युटेरस यांनी हेल्थशॉट्सला दिलेल्या माहितीनुसार, सार्वजनिक शौचालयात लघवी करण्याचा योग्य मार्ग आज आपण पाहणार आहोत.

  • 5/9

    डॉ तानिया सांगतात की, “जेव्हा लघवी करताना तुम्ही नीट बसलेले नसाल आणि फक्त टॉयलेट सीटवर स्क्वॉटमध्ये बसलेले असता तेव्हा पेल्विकवर ताण येऊ शकतो. असे केल्यास कालांतराने पेल्वीस कमकुवत होऊ शकते.”

  • 6/9

    तुमच्या ओटीपोटात तीन अवयव असतात, तुमचे मूत्राशय जेथे शरीरातील लघवी जमा होते, तुमचे गर्भाशय आणि गुदाशय. तुमचे ओटीपोट म्हणजेच पेल्वीस महत्त्वाची भूमिका बजावते, अन्यथा, हे अवयव खालच्या बाजूला सरकू शकतात. या स्थितीला पेल्विक ऑर्गन प्रोलॅप्स म्हणतात.

  • 7/9

    राहिला प्रश्न स्वच्छतेचा तर मुख्यतः सार्वजनिक शौचालयात विविध ठिकाणांहून जंतू घेऊन येणाऱ्या अनेक हातांनी दरवाजाच्या नॉबला स्पर्श केलेला असतो. तुम्ही दरवाजा उघडण्यासाठी टिश्यू वापरू शकता. जर तुम्हाला विषाणूची भीती असेल तर त्यासाठी आपण अँटी बॅक्टरीयल स्प्रे वापरू शकता.

  • 8/9

    अशाप्रकारे टॉयलेट सीटवर स्क्वॉट पोजीशनमध्ये बसल्याने पेल्विक कमकुवत होऊ शकते. डॉ. तानिया सांगतात की, लक्षात ठेवा टॉयलेट सीटवरून तुम्हाला मूत्रमार्गाचा संसर्ग किंवा सेक्श्युअली ट्रान्समिटेड आजार होऊ शकत नाही.

  • 9/9

    ब्लो ड्रायरच्या गरम हवेमुळे हवेत जंतू पसरू शकतात. आपले हात धुतल्यानंतर कोणताही संसर्ग टाळण्यासाठी, आपले हात पेपर टॉवेल किंवा रुमालाने पुसा. (सर्व फोटो: Pexels/ लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: While peeing do not hover or squat on western commodes doctor tells how it affects body specially women check washroom rules svs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.