• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. why you tend to sleep more in winter know relation of extra sleep and winter season ndj

हिवाळ्यात जास्त झोप का लागते? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..

तुम्ही कधी निरीक्षण केले का, उन्हाळ्याच्या तुलनेत आपण हिवाळ्यात जास्त वेळ झोपतो. असं का? कारण तज्ज्ञांच्या मते, ऋतूनुसार आपल्या झोपण्याच्या सवयी बदलतात. आज आपण त्याविषयीच सविस्तर जाणून घेऊ या.

December 14, 2023 23:49 IST
Follow Us
  • Sleep in winter
    1/9

    आपल्यापैकी अनेक जणांना हिवाळा ऋतू आवडतो, कारण हिवाळा हा उष्ण आणि दमट वातावरणापासून आपली सुटका करतो. थंडीच्या दिवसांमध्ये वातावरणात गारवा जाणवतो. हिवाळ्यात आपल्याला अंथरुणावरून उठण्याची इच्छा होत नाही. (Photo : Freepik)

  • 2/9

    तुम्ही कधी निरीक्षण केले का, उन्हाळ्याच्या तुलनेत आपण हिवाळ्यात जास्त वेळ झोपतो. असं का? कारण तज्ज्ञांच्या मते, ऋतूनुसार आपल्या झोपण्याच्या सवयी बदलतात. आज आपण त्याविषयीच सविस्तर जाणून घेऊ या. (Photo : Freepik)

  • 3/9

    हैदराबादच्या यशोदा हॉस्पिटल येथील पल्मोनोलॉजी आणि स्लीप मेडिसीनच्या सल्लागार डॉ. विश्वेश्वरन बालासुब्रमण्यम यांनी या विषयी द इंडियन एक्स्प्रेसच्या एका वृत्तात सांगितले, “माणसाच्या झोपेच्या सवयींवर दैनिक प्रक्रियांचा प्रभाव पडतो. आपल्या शरीरात ‘टाईम किपिंग’ म्हणजेच वेळ पाळणाऱ्या पेशी असतात. या क्लॉक पेशी पर्यावरणाशी संक्रमित होतात. तापमान आणि वातावरणात बदल होतो, यास स्वत:ला अनुकूल ठेवण्यासाठी शरीर तसे प्रतिसाद देतात.” (Photo : Freepik)

  • 4/9

    यामुळेच वातावरणात बदल होताच तापमानावर परिणाम होतो आणि आपला झोपेचा कालावधी बदलतो.यावर फरिदाबाद येथील अमृता हॉस्पिटलच्या मानसोपचार विभागाचे प्रमुख डॉ. विकास गौर सांगतात, “झोपेच्या सवयी या ऋतूनुसार बदलू शकतात. कारण प्रकाश आणि काळोख हे मानवी झोपेच्या चक्राचे नियमन करण्यासाठी महत्त्वाचे घटक आहे. (Photo : Freepik)

  • 5/9

    प्रकाशामुळे मेंदूतील प्रमुख भाग उत्तेजित होतो, ज्यामुळे मेलाटोनिन हार्मोन आणि शरीराचे तापमान नियंत्रित राहते. पण, जेव्हा दिवस मावळतो तेव्हा या मेलाटोनिन हार्मोन आणि शरीराच्या तापमानाची पातळी वाढते आणि आपले शरीर आपल्याला झोपण्याची वेळ आली, असे सुचवते. सकाळी मेलाटोनिनची पातळी कमी होते, त्यामुळे आपण सकाळी उठतो.”
    “उन्हाळ्यात दिवस मोठा असतो तर हिवाळ्यात रात्र मोठी असते. त्यामुळे याचा परिणाम मेलाटोनिन हार्मोन आणि झोपेच्या सवयीवर होतो”, असेही डॉ. गौर म्हणाले. (Photo : Freepik)

  • 6/9

    तज्ज्ञांच्या मते, “मुळात फक्त प्रकाश आणि काळोखामुळेच झोपेवर परिणाम होत नाही, तर हिवाळ्यातील कमी तापमानसुद्धा झोपण्यास कारणीभूत असतात. उन्हाळ्यात अति उष्णता असते, त्यामुळे झोप येणे कठीण होते. उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यात आपला मेंदू जास्त सक्रिय नसतो, ज्यामुळे आपल्या झोपेवर परिणाम होऊ शकतो.” (Photo : Freepik)

  • 7/9

    ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. ज्योती कपूर सांगतात, “हिवाळ्यात अधिक झोप येणे ही सामान्य गोष्ट आहे. हिवाळ्यात दैनंदिन झोपेच्या कालावधीत १.७५ ते २.५ तास अधिक वाढ होऊ शकते.” (Photo : Freepik)

  • 8/9

    डॉ. विकास गौर सांगतात, “खरं तर हिवाळ्यात झोपेचा कालावधी जास्त किंवा कमी होत नाही, पण एखाद्याला हिवाळ्यात जास्त झोपेची गरज भासू शकते; कारण दिवस लहान असतो आणि रात्र मोठी असते. हिवाळ्यात अंथरुणावर दिवसभर पडून राहणे चांगले नाही. कारण यामुळे आपल्या शरीरातील दैनंदिन प्रक्रियांवर आणि मेलाटोनिन हार्मोनवर परिणाम होतो. (Photo : Freepik)

  • 9/9

    हिवाळ्यात दिवसा जास्तीत जास्त प्रकाश घेण्याचा प्रयत्न करा.दररोज नियमित १० ते ३० मिनिटे व्यायाम करा, यामुळे तुम्हाला रात्री चांगली झोप येईल.दिवसा झोपू नका.तुमच्या खोलीचे तापमान खूप जास्त थंड किंवा गरम नसावे.हिवाळ्यात अति जास्त जेवण करू नका.गरज भासल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.(Photo : Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Why you tend to sleep more in winter know relation of extra sleep and winter season ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.