-
थंडी सुरु झाली की बाजारात भरपूर संत्री विकायला येतात. संत्र्यांचे आरोग्यासाठीचे फायदे आपण सगळेच जाणून आहोत पण आज आम्ही आपल्याला संत्र्यांच्या सालीचा फायदा सांगणार आहोत, त्यामुळे पुढे जाण्याआधीच लक्षात ठेवा चुकूनही संत्र्याची साल फेकू नका
-
आवडीने घरात तयार केलेली बाग फुलांनी व हिरव्यागार पानांनी बहरून जावी यासाठी आपल्याला संत्र्यांच्या सालींचा वापर करायचा आहे, कसा करायचा हे ही पाहूया..
-
संत्र्याच्या साली २२ ते २४ तास पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर हेच पाणी आपल्याला कुंड्यांमध्ये टाकायचे आहे
-
संत्र्यांच्या सालींमधून झाडांना भरपूर प्रमाणत पोटॅशियम मिळते ज्यामुळे झाडांची वाढ वेगाने होण्यास मदत होते.
-
संत्रीच्या सालींमधून मिळणारे नायट्रोजन आणि फॉस्फरस हे मुख्यतः फुलझाडांसाठी जादुई काम करते, यामुळे फुलं येणं बंद झालेल्या रोपांनाही बहर येऊ शकतो
-
झाडांची पानं कायम हिरवीगार आणि टवटवीत राहावीत यासाठी आपण या संत्र्याच्या सालीच्या पाण्याची फवारणी करू शकता
-
रोपट्याच्या मुळाशी मुंग्या येणे किंवा बुरशी लागणे असे त्रास असतील, तर संत्र्यांचे अँटी- बॅक्टरीयल गुणधर्म बुरशी, किडे, मुंग्या कमी होण्यासाठी फायद्याचे ठरू शकतात
-
संत्र्याच्या साली जर आपण मेणासह गरम केल्या तर आपण यातून सुंदर सुंगंधी मेणबत्त्या सुद्धा तयार करू शकता.
-
टॉयलेट बाथरूम मध्ये फ्रेशनर स्प्रेप्रमाणे सुद्धा या संत्र्याच्या सालीच्या पाण्याचा वापर होऊ शकतो.
Garden Hack: अर्धा लीटर पाण्यात संत्र्याच्या साली टाकून ‘असा’ करा वापर; रिझल्ट बघून आनंदून जाल, बहरून जाईल घर
Orange Peel Gardening Hacks: आज आम्ही आपल्याला संत्र्यांच्या सालीचा फायदा सांगणार आहोत, त्यामुळे पुढे जाण्याआधीच लक्षात ठेवा चुकूनही संत्र्याची साल फेकू नका.
Web Title: Add orange peels in half liter water to plants rose hibiscus mogara and tulsi results will make you happy home garden hacks marathi svs