• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. personality test your blood group tells your nature and personality what is your blood group ndj

Personality Test : तुमचा ब्लड ग्रुप कोणता? ब्लड ग्रुपनुसार ओळखा व्यक्तीचा स्वभाव…

तुम्ही कधी ‘केत्सुकी-गाटा’हा शब्द वाचला किंवा ऐकला आहे का? ‘केत्सुकी-गाटा’ही एक जपानची संकल्पना आहे. या संकल्पनेच्या माध्यमातून ब्लड ग्रुपनुसार व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्त्व, आणि अन्य गोष्टी जाणून घेऊ शकतो. आज आपण ब्लड ग्रुपनुसार व्यक्तीचा स्वभाव जाणून घेणार आहोत.

December 16, 2023 16:16 IST
Follow Us
  • Personality Test
    1/9

    तुम्ही कधी ‘केत्सुकी-गाटा’हा शब्द वाचला किंवा ऐकला आहे का? ‘केत्सुकी-गाटा’ही एक जपानची संकल्पना आहे. या संकल्पनेच्या माध्यमातून ब्लड ग्रुपनुसार व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्त्व, आणि अन्य गोष्टी जाणून घेऊ शकतो. (Photo : Freepik)

  • 2/9

    टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या एका वृत्तानुसार, १९३० मध्ये टोकेजी फुरुकावा या जपानच्या प्राध्यापकांनी त्यांच्या अभ्यासातून सांगितले होते की प्रत्येक ब्लड ग्रुपच्या व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्त्व आणि गुण वेगवेगळे असतात. (Photo : Freepik)

  • 3/9

    तुम्हाला आश्चर्य वाटेल पण जपानचे लोकं या संकल्पनेवर खूप विश्वास ठेवतात.याच्या मदतीने जपानचे लोक कर्मचाऱ्याची क्षमता आणि एवढंच काय तर लग्नासाठी दोन व्यक्तींची सुसंगतपणा जुळून येते की नाही, हे सुद्धा बघतात. (Photo : Freepik)

  • 4/9

    ब्लड ग्रुपचे एकूण चार प्रकार आहेत. A, B, AB आणि O. शरीरात असणाऱ्या रक्तपेशीवरील अ‍ॅन्टिजेन व्यक्तीचा ब्लड ग्रुप कोणता हे ठरवतो. A, B, AB आणि O ला दोन भागात विभागले आहे. एक म्हणजे ‘आरएच’ पॉझिटिव्ह व दुसरा म्हणजे ‘आरएच’ निगेटिव्ह होय. आज आपण ब्लड ग्रुपनुसार व्यक्तीचा स्वभाव जाणून घेणार आहोत. (Photo : Freepik)

  • 5/9

    ब्लड ग्रुप A असलेले लोकं खूप संवेदनशील, सहकार्य करणारे आणि भावनिक असतात. ते अतिशय हुशार आणि प्रामाणिक असतात. त्यांच्यामध्ये खूप सहनशक्ती असते. त्यांना नेहमी शांतता हवी असते त्यामुळे त्यांना वाद घालायला आवडत नाही. त्यांना समाजाने घालून दिलेले नियम मोडणे आवडत नाही. हे लोकं खूप विचारपूर्वक निर्णय घेतात. ते सर्व क्षेत्रात वावरत असतात पण ते मल्टीटास्क करू शकत नाही. त्यांना नेहमी स्वच्छ आणि नीटनीटके राहायला आवडते.त्यांना कोणत्याही गोष्टीचा खूप लवकर ताण येतो. त्यामुळे त्यांच्या शरीरात कार्टिसोल हार्मोनची पातळी नेहमी उच्च स्तरावर असते. हे लोक विश्वासू मित्र बनवतात. ते त्यांच्या भावना ठराविक लोकांबरोबरच शेअर करतात. (Photo : Freepik)

  • 6/9

    B ब्लड ग्रुप असणारे लोकं खूप क्रिएटिव्ह असतात आणि लवकर निर्णय घेतात. ते प्रत्येक गोष्टीमध्ये लक्ष केंद्रित करतात. त्यांना नेहमी खूप चांगले करण्याची इच्छा असते पण ब्लड ग्रुप A च्या लोकांप्रमाणे ते सुद्धा मल्टीटास्क करू शकत नाही. ते इतरांविषयी सतत विचार करतात आणि त्यांनी नेहमी इतरांविषयी सहानभूती वाटते. ते नेहमी विश्वासार्ह मित्र बनवतात.यांच्या मनात अनेकदा नकारात्मक विचार येतात. नकारात्मक व्यक्तिमत्त्वामुळे यांना अनेकदा भेदभावाचा सामना करावा लागतो. त्यांच्या नकारात्मक व्यक्तिमत्त्वामुळे अनेकदा ते एकटे पडतात. (Photo : Freepik)

  • 7/9

    ब्लड ग्रुप AB च्या लोकांचा स्वभाव हा ब्लड ग्रुप A आणि ब्लड ग्रुप B च्या लोकांच्या स्वभावाचे मिश्रण असते. हे लोक खूप क्लिष्ट असतात आणि दुहेरी व्यक्तिमत्त्व घेऊन जगतात.ब्लड ग्रुप A प्रमाणे लाजाळू तर ब्लड ग्रुप B प्रमाणे आउटगोइंग असू शकतात.अनोळखी व्यक्तींना त्यांचे खरे व्यक्तिमत्त्व ओळखता येत नाही आणि त्यांना समजून घेणे अवघड वाटते. (Photo : Freepik)

  • 8/9

    ब्लड ग्रुप AB चे लोक खूप मनमोहक असतात आणि खूप लवकर मित्र बनवतात. कोणत्याही प्रकारचा तणाव किंवा ताण त्यांना हाताळणे कठीण जाते. इतर लोकांबरोबर ते खूप काळजीपूर्वक वागतात आणि इतरांप्रती सहानभूती दाखवतात. या लोकांकडे खूप चांगली आकलनशक्ती आणि तर्क कौशल्ये असतात. (Photo : Freepik)

  • 9/9

    O ब्लड ग्रुपचे लोक अतिशय धाडसी, बिनधास्त आणि आत्मविश्वासू असतात.ते स्वत:ला उच्च स्तरावर नेण्याचा प्रयत्न करतात आणि त्यासाठी ते वाट्टेल ते मेहनत घेतात. या लोकांमध्ये उत्कृष्ट नेतृत्व गुण असते ज्यामुळे लहान लहान गोष्टींचा त्यांना कधीही त्रास होत नाही. ते उदार स्वभावाचे आणि खूप दयाळू असतात. कोणताही नवीन बदल ते लगेच स्वीकारतात.कठीण प्रसंगात ते नेहमी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतात.जपानचे लोकं O ब्लड ग्रुपच्या लोकांना योद्धा समजतात कारणे ते खूप आतून धैर्यवान आणि कोणत्याही गोष्टीचा शेवटपर्यंत सामना करतात. हे लोक खूप प्रामाणिक असतात त्यामुळे यांना खोटं बोलणाऱ्या लोकांचा राग येतो. (Photo : Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsव्यक्तिमत्वPersonality

Web Title: Personality test your blood group tells your nature and personality what is your blood group ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.